Header Ads Widget

Responsive Image

आमदार रणधिर भाऊ सावरकर यांच्या अथक प्रयत्नाने सिमेंट काँक्रिटी रस्त्याचे कामाला सुरवात


आमदार रणधिर भाऊ सावरकर यांच्या अथक प्रयत्नाने सिमेंट काँक्रिटी रस्त्याचे कामाला सुरवात 

अकोला :- आझाद नायक न्युज 

अकोला टावर चौक ते रमेश बजाज यांच्या निवासाला समोर सिमेंट काँक्रिटी रस्त्याचे काम स्टेट बँक आणि महानगर पालिका यांच्या न्यायालयीन लढाईमुळे थांबले होते.परंतु अकोला पूर्वचे आमदार विकासपर्व साठी प्रयत्नशील रणधिर भाऊ सावरकर यांच्यामुळे महानगरपालि केच्या ताब्यातील तीन फुटाचा रस्ता विस्तारीकरणाचा काँक्रिटीकरण काम सुरू झाला आहे सातत्याने सर्वसामान्यांना सुविधा मिळावी यासाठी आ. सावरकर प्रयत्नशील असतात त्यांनी या संदर्भात न्यायालयीन लढाई सुप्रीम कोर्टात सुरू असताना ज्या जागेचा वाद नाही त्या १२४ मीटर रस्त्याचे विस्तारी करण महानगर पालिकेने करून दळण - वळणाची सुविधा सर्वसामान्यांना मिळून द्यावी.

यासाठी भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल व महापौर अर्चनाताई मसने यांच्या कडे जबाबदारी सोपवून आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने व अनेक दिवसापासून होणारी असुविधा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला आहे.


पश्चिम पूर्व या भागाला जोडणारा नवीन आणि जुन्या शहराला महत्त्वाचा सेतू ठरणारा रस्त्याचा काम आरंभ झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे या या रस्त्यामुळे दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे तसेच वाहतुकीची कोंडीचा मार्ग देखील सुटणार आहे.

Post a Comment

0 Comments