Header Ads Widget

Responsive Image

जळगांव मधील तरुणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून केली बदनामी... चाळीसगाव तालुक्यातील तरुणावर गुन्हा दाखल

जळगांव :- तरुणीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करून केली बदनामी... चाळीसगाव तालुक्यातील तरुणावर गुन्हा दाखल


जळगाव शहरातील एका भागातील तरूणी सोबत प्रेमसंबंध असताना तरुणाने तिला व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल करून अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो व्हॉट्स अपवर व्हायरल केल्याची धक्का दायक घटना समोर आला आहे.

याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील एका भागातील २२ वर्षीय तरूणीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते.

या प्रेमसंबंधातून तरूणाने एकेदिवशी तरूणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल केला. यात तरूणाने तरूणीला अंगावरचे संपूर्ण कपडे काढण्यास सांगितले.
तरुण जसे सांगेल तसेच तरुणीने त्यास करून दाखविले. हा संपूर्ण प्रकार तरूणाने रेकॉर्ड केला व तयार अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्राला व्हॉट्सअपवर व्हायरल केला.

या प्रकारामुळे तरुणीची बदनामी झाली. अशी तक्रार तरुणीने मंगळवार १ मार्च रोजी जळगाव सायबर पोलिसांत दिली असून त्यावरुन तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Post a Comment

0 Comments