Header Ads Widget

Responsive Image

भावसार गौरव गाथा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.


भावसार गौरव गाथा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.              

नांदेड :-
 भावसार गौरव गाथा या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा रामदास पेंडकर तानुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार्डी वैजापुर येथे दि. 20.2.2022 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न  झाला यावेळी ते म्हणाले भावसार गौरव गाथा म्हणजे हा एक ऐतिहासिक ठेवा आहे प्रत्येक भावसार बंधू आणि भगिनीनी, युवकांनी या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे, प्रत्येकानी घरांमध्ये हा ग्रंथ ठेवला पाहिजे,  लग्नसोहळा, वाढदिवस, इतर शुभ कार्यामध्ये पाहुण्यांना हा ग्रंथ भेटवस्तू म्हणून दिली पाहिजे तरच भावसार गौरव गाथेमध्ये असलेल्या विचारांचा देवाण-घेवाण व प्रचार प्रसार होईल असे मला वाटते.


भावसार गौरव गाथा ग्रंथ निर्मितीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य केलेल्या सर्व भावसार बंधू भगिनीं चे आभार मानले प्रमुख पाहुणे रमाकांत बुद्धिवंत येवला, संतोष जवादे वाशिम, बाळु महाराज पेठकर (मठाधिपती संभाजी महाराज संस्थान कामारी यांचे वंशज)  लाभले. सत्य गणपती  मंदिर पासून ते मारुती मंदिर पर्यंत ढोल ताशांच्या गजरात,भावसार गौरव गाथा  या ग्रंथाचे ग्रंथ दिंडी, शोभा यात्रा काढण्यात आली त्यात अनेक भावसारबंधू आणि भगिनी फुगडी खेळले डान्स करून आनंदोत्सव साजरा केले त्यानंतर सत्य गणपतीची पूजा व आरती केले.

हिंगलाज माता व आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेस पूजा व पुष्पहार टाकून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले.

व विशाल विलासराव भोकरे यांचे भरत नाट्यम गणेश वंदना घेण्यात आली नंतर गायत्री मंत्राने कार्यक्रमा ची सुरुवात केले.सर्व प्रमुख पाहुणे व उद्घाटक यांच्या शुभहस्ते भावसार गौरवगाथा या ग्रंथाचे प्रकाशन करून ग्रंथाचे वाटप करण्यात आले त्यानंतर भावसार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी सोनवणे यांनी प्रस्ताविक भाषण केले त्यात भावसार सेना संघटनाचे आज पर्यंत केलेले कार्य व पुढील ध्येय धोरण  यांची माहिती दिले.

भावसार सेनेचे राज्य सचिव अभिषेक ताकझुरे यांनी समाज संघटन कसे करावे संघटनेची आवश्यकता काय आहे यावर प्रकाश टाकले नंतर रमाकांत बुद्धिवंत काका,येवला यांनी रंगारी यांचे मुख्य धंदा रंग काम, रंगणी हे आहे याला जिवंत ठेवण्यासाठी करत असलेले कार्य व सध्याची रंग कामाची स्थिती यावर प्रकाश टाकले.

 संतोष जवादे वाशिम यांनी आपल्या मधुर वाणीतून होत असलेल्याभावसार गौरवगाथा या ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याचे गुणगौरव केले व संघटन काळाची गरज आहे आपण संघटित राहिली पाहिजे हा ग्रंथ म्हणजे नव युवकासाठी दिलेला मोठा ठेवा आहे असे ते व्यक्त केले.बाळू महाराज पेठकर यांनी वारकरीसंप्रदायासाठी पंढरपूर,आळंदी येथे आपल्या समाजाचे धर्मशाळा असणे आवश्यक आहे आणि आपण सर्व एकजुटीने राहून सामाजिक कार्य केले पाहिजे भावसार गौरव गाथा हा ग्रंथ प्रत्येका च्या घरात घरात राहिला पाहिजे असे ते व्यक्त केले त्यानंतर रमेशजी पुरनाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना रमेश पुरनाळे यांनी आपल्या मधुर वाणीतून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमास भावसार सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद तसेच भावसार बंधू आणि भगिनीनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments