Header Ads Widget

Responsive Image

देवदूत म्हणून धावून आलेल्या पोलिसांचा सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केला सत्कार


देवदूत म्हणून धावून आलेल्या पोलिसांचा सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केला सत्कार

अकोला प्रती - जीवनात अत्यंत अडी अडचणी, समस्या, चिंता, वाद-विवाद, शुल्लक कारण आधीच्या वळणावरून गतिमान होत असताना वैफल्यग्रस्त नाउमेद होऊन एकाकी टोकाचा निर्णय घेण्यात येतो असाच काहीसा प्रकार अकोला जुने शहरातील लोखंडी पुलावर घटना, घडता घडता टाळता आली ,प्रकार ही तसाच होता लोखंडी पुलावरून आत्महत्या करण्या साठी एक महीला उडी घेणार तेवढ्यात पोलिसा चे प्रसंगावधानामुळे या महिलेचे प्राण वाचविण्या त यश आले पोलिस देवदूत म्हणून धावले म्हणून एका महिलेचे प्राण वाचले आहेत.

   अकोला जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस वाहन घेऊन पोलिस मुख्यालयात जात असताना शिव नगर जुने शहर अकोला येथील एका 47 वर्षीय महिला ही महाराणा प्रताप बागेच्या लगत जय हिंद चौकाकडे जात असलेल्या रस्त्यामधील लोखंडी पुलावरून आत्महत्या करत असल्याचा पोलिसांना संशय आल्याने क्षणाचाही विलंब न करता या महिला शेख रशीद बक्कल नंबर 323 खुपिया विभाग आणि पोलीस वाहन चालक प्रदीप वानखडे बक्कल नंबर 416सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जुने शहर अकोला पोलीस स्टेशन मधील यांनी त्या महिलेला लोखंडी पुलावरून उडी घेण्या पूर्वीच महिलेचा हात ओढला व बाजूला करून त्या महिलेचे प्राण वाचविले हे करत असताना त्यांच्या समवेत वाहन चालक प्रदीप वानखडे यांनी या महिलेला विचारपूस करून सुखरूप घरी पोहोचवले मदत केली आणि या महिलेचे प्राण वाचविले आहे जुने शहर पोलीस स्टेशन मधील शेख रशीद प्रदीप वानखडे यांनी महिलेचे प्राण वाचविले याने अभिमाना स्पद कार्य केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते उमेश सुरेशराव इंगळे व सामाजिक कार्यकर्ता सतीश भाऊ तेलगोटे यांनी जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचं कौतुक केले

Post a Comment

0 Comments