अकोला ( प्रती)
आगामी सण उत्सव धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त सागर कॉलनी येथे कॉर्नर मिटींग घेण्यात आली.
नागरीकांना कॉर्नर मिटिंगमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचना समजावून सांगिण्यात आल्या व कोविडच्या गाईडलाईन पाहता सार्वजनिक स्वरूपात मोठ्या स्वरूपाचे आयोजन करू नये असे सांगण्यात आले तसेच भविष्यात येणाऱ्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना चे वेळोवेळी आपणास माहिती देण्यात येईल व त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करावी येथील नागरिकांनी सुद्धा सदर चांगला प्रतिसाद दिला.
मीटिंगमध्ये जुने शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार माननीय पोलीस निरीक्षक श्री सेवानंद वानखडे यांनी खुप मोलाचं मार्गदर्शन केले यावेळी जुने शहर पोलिस स्टेशन चे पोलीस कर्मचारी पियुष शेगोकार,शेख रशिद, माजी नगरसेवक गजानन गवई,सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, माजी सैनिक दामोदर सिरसाठ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते घुगे साहेब, ॲड.भिमराव खंडारे, सुधाकर तेलगोटे, माणिक अरखराव,अनिता तेलगोटे, शोभाताई खाडे,लीला बाई सावदेकर,संगिता अरखराव सागर सिरसाठ,जोत्यस्ना सिरसाठ, सिध्दांत वानखडे(चांदुर) रुषीकेश वानखडे(चांदुर) जया ताई वानखडे उपस्थित होते.
0 Comments