Header Ads Widget

Responsive Image

भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट, नांदेड तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन


भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेड तर्फे   स्पर्धेचे आयोजन
-------------------------------------------------
आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांच्या 167 वी जयंती निमित्त भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेड तर्फे खालील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेआहे.
निबंध लेखन स्पर्धा, श्री गणेश मुर्ती उत्कृष्ट सजावट स्पर्धा, श्री महालक्ष्मी मूर्ती उत्कृष्ट सजावट स्पर्धा.
अ गट . निबंध लेखन स्पर्धा.

1) आद्य संघटक श्री महादेवरावजी तेलकर यांचे जीवन चरित्र.( खुला वर्ग वयाची अट नाही.)

2) महापुरुषांची जयंती का साजरी करावी. (खुला वर्ग वयाची आट नाही)

3) विवाह समस्या व उपाय (खुला वर्ग वयाची अट नाही).
ब गट.

4)माझा आवडता उत्सव गणेश उत्सव. (वर्ग पाचवी ते वर्ग दहावी)

5) माझी आई/माझे बाबा., कोरोना काळातील शिक्षणा पुढील आव्हाने किंवा कोरोना काळातील शिक्षण पद्धत ( वर्ग दहावी ते बारावी व त्यापुढील विद्यार्थी).
क गट.

6) श्रीमहालक्ष्मी मूर्ती उत्कृष्ट सजावट. (वयाची अट नाही.)
ड गट.

7) श्री गणेश मूर्ती उत्कृष्ट सजावट (वयाची अट नाही).

आपले निबंध लेखन दिनांक. 23.9. 2021.पर्यंत पोस्टाने पोहोचतील असे पाठवावे या तारखे नंतर आलेल्या निबंधांचा विचार केला जाणार नाही. पोस्टाने खालील पत्त्यावर पाठवावे 

रामदास शामराव पेंडकर तानुरकर. शांता माऊली सदन. घर नंबर. 3  तरोडा नाका, शेतकरी पुतळ्याजवळ,  रविराज नगर नांदेड. जिल्हा नांदेड.
मोबाईल  :-  8485849435
 महाराष्ट्र. पिन नंबर.431605.

श्री महालक्ष्मी मूर्ती उत्कृष्ट सजावट  व श्री गणेश मूर्ती उत्कृष्ट सजावट चे फोटो खालील व्हाट्सअप नंबर वर पाठवावे  एक फोटो,जास्तीत जास्त 2 फोटो. दोन पेक्षा जास्त फोटो पाठवलेल्या स्पर्धकांना स्पर्धेतून बाद करण्यात येईल. कृपा करून याची नोंद घ्यावी ही विनंती.

8485849435.

विशेष सूचना.


1) एका व्यक्तीस एकाच स्पर्धेत भाग घेता येतो. एक व्यक्ती दोन स्पर्धेत भाग घेतल्यास दोन्ही स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

2) निबंध लेखनाचा लेख व  श्री महालक्ष्मी मूर्ती उत्कृष्ट सजावट तसेच श्री गणेश मूर्ती उत्कृष्ट सजावट चे फोटो वर दिलेल्या तारखेनंतर समितीकडे आल्यास स्विकारले जाणार नाहीत.

3) निबंध लेखन खुला वर्गासाठी कमीत कमी 300. शब्द व जास्तीत जास्त 400 शब्दात असावा व विद्यार्थी गटासाठी250ते300 शब्दात असावा

4) प्रत्येक गटात प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक काढण्यात येईल.

5)समितीचा निर्णय अंतिम राहील.भावसार सेना सेवा समिती ट्रस्ट नांदेड.आपल्या सेवेत
जय भावसार 

Post a Comment

1 Comments

  1. आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमा साठी आपले खूप अभीनंदन.
    अशा स्पर्धेमुळे मुलांमध्ये त्यांच्या
    ज्ञानामध्ये भर पडून उत्साह वाढतो.
    असेच ज्ञानवर्धक कार्यक्रम नेहमी व्हावेत हिच सदिच्छा आणि अभिनंदन.
    विजयकुमार भायेकर.

    ReplyDelete