अकोला दि. ०९.जुलै.२०२५,
मुकेश भावसार, संपादक
केंद्र-राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करीत आयटक कामगार संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्ष बँक कर्मचारी ई पी एस पेन्शन धारक तर्फे बुधवारी अशोक वाटिका समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अंगणवाडी, आशा, कृषी विद्यापीठ कामगार,बँक कर्मचारी,एम.आय.डी.सी.कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी व इतर संघटनाही सहभाग झाल्या.
केंद्रातील मोदी सरकार, राज्या तील महायुती 3 पायी सरकार कामगार विरोधी व भारतीय जनविरोधी धोरणे राबवत असल्याचा आरोप अंगणवाडी, आशा, ई पी एस पेन्शन धारक कृषी विद्यापीठ कामगार, बँक कर्मचारी, एम.आय.डी.सी. कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी व भाकपने केला.
सुधारणांच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकाराने नवीन ४ कामगार कायदे (लेबर कोड बिल) तयार केले ते रद्द करण्यात यावे ई पी एस पेन्शन धारक, अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार व सर्व योजना कर्मचारी यांना ९०००/- पेंशन व त्यावर महागाई भत्ता व राज्य आरोग्य विमा ई एस आय सी लागु करा, बँक व इतर सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण रद्द करण्यात यावेत.
किमान वेतन २६ हजार रूपये जाहीर करून अंगणवाडी, आशा, कृषी विद्यापीठ कामगार व शालेय पोषण आहार योजना कामगारांना कर्मचारी कायम कर्मचारी जाहिर करा., इंधन व गॅस सिलींडर दरवाढ कमी करावी वाढत चाललेली महागाई कमी करा.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा थकीत भत्ता तातडीने देण्यात यावा. निवृत्त, मृत्युमुखी पडलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना एक रक्कमी लाभ देण्यात यावा. आशा कर्मचारी थकीत असलेला मोबदला त्वरित द्या. वाढत चाललेल्या बेरोजगारीला आळा घाला केंद्र व राज्य सरकार विभागात रिक्त असलेले पदे त्वरित भरा.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल करा, पत्रकार यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करा.
शेतकरी शेतमजुर यांच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करा. या संपाला डाव्या पक्षांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमेटीने जाहीर समर्थन दिले.
अकोल्यातील ७ तालुक्यात कॉ. रमेश गायकवाड, कॉ. सुनीता पाटील, कॉ. नयन गायकवाड यांच्या नेतृत्त्वात आंदोलन होऊन मा. जिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन राष्ट्रपती पंतप्रधान यांना पाठवण्यात आले आंदोलनात जिल्हाध्यक्ष कॉ. रमेश गायकवाड, राज्य कॉन्सिल सदस्य नयन गायकवाड, कॉ. देवराव पाटील हागे, कॉ. अनिल मावळे, कॉ. सुरेखा ठोसर,कॉ. मायावती बोरकर, कॉ. प्रवीण महाजन बँक कर्मचारी नेते, ज्योती ताथोड, छाया वारके, सविता प्रधान, शालू नाईक, पुनम खोब्रागडे, प्रिया वरोटे, वंदना डांगे, अनिता अंभोरे, राजकन्या बनसोड, हजारा परवीन सह शेकडो कामगार कर्मचारी अकोल्यातील नागरिक सहभागी झाले होते.
0 Comments