मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त भावसार सेना सेवा समिती नांदेड तर्फे दिनांक. 17.9.2021.रोजी कार्यक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम आद्य संघटक, थोर समाजसेवक श्री महादेवरावजी तेलकर,
श्री हिंगलाजमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून पुष्प पूजा करण्यात आले. नंतर या संग्रामामध्ये होतात्मे झालेल्या सर्व शूरवीरांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आदर्श शिक्षिका सौ.कल्पना पुरनाळे मॅडम यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिना बद्दल माहिती दिले,
भारत स्वातंत्र्यानंतरही मराठवाडा कसा निजामी राजवटीत, पारतंत्र्यात होता व रझाकारांच्या अत्याचारा विरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी कसा लढा दिला,बलिदान दिले याबद्दल इतिहास सांगितले. तसेच युवा पिढीला व बालकांना यांच्या बलिदानाची माहिती मिळणे किती आवश्यक आहे हे थोडक्यात सांगितले. व सर्वांचे लाडके भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना 71 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यांच्या RSS च्या सच्या कार्यकर्त्या च्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतले.
भावसार सैनाचे पदाधिकारी श्री चंद्रकांतजी बुलबुले यांनी वसमत येथील स्वातंत्र सैनिक धोंडीराम गुंडाळे यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती दिली.
भावसार सेना सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदास पेंडकर तानूरकर यांनी संघटनेची ताकद, संघाची ताकद त्याचे महत्त्व सांगून हुतात्मा गोविंदरावजी पानसरे, हुतात्मा राजाराम मुधोळकर येताळा यांच्या जिवन कार्याबद्दलची सविस्तर माहिती सांगितले .
2 Comments
नांदेड येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड़ा मुक्ती स्वातंत्र्य संग्राम दिन भावसार सेना संघटनेच्या वतीने नियाेजन पुर्वक साजरा करुन राष्ट्रीय प्रेम, निष्ठा, देश भक्ति, स्वातंत्र्य सैनिक यांचे केलेेले कार्य समाज बांधवाना माहीती व्हावी व पुढील नवयुवकानां प्रेरणा मिळावी हा ऊद्देश, ही संकल्पना आपण आपल्या मंडळाच्या वतीने प्रत्यक्ष राबवुन
ReplyDeleteही समाजासाठी अभिमानास्पद व काैतुकास्पद विशेष बाब आहे, स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मरण, व त्याचे व्यर्थ न हो बलिदान हे जाेपासली, पैठण भावसार समाजाचे वतीने हार्दिक अभिनंदन धन्यवाद पंडित बाेंबले अध्यक्ष भावसार समाज पैठण
स्वातंत्र्य सैनिक यांचे केलेेले कार्य समाज बांधवाना माहीती व्हावी व पुढील नवयुवकानां प्रेरणा मिळावी हा ऊद्देश ही संकल्पना आपण आपल्या मंडळाच्या वतीने प्रत्यक्ष राबवुन ही समाजासाठी अभिमानास्पद व काैतुकास्पद विशेष बाब आहे पैठण भावसार समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन धन्यवाद पंडित बाेंबले अध्यक्ष भावसार समाज पैठण
ReplyDelete