Header Ads Widget

Responsive Image

ओळखपत्रधारक पत्रकारांना मंत्रालयात प्राधान्न्याने प्रवेश व लोकल प्रवासाची मुभा द्या !

ओळखपत्रधारक पत्रकारांना मंत्रालयात प्राधान्न्याने प्रवेश व लोकल प्रवासाची मुभा द्या !

 लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मागणी

अकोला 
       सामाजिक जीवन आणि पत्रकारांच्या कल्याण योजनांबाबत निर्णय आणि अंमलबजावणीची माहिती घेण्याकरीता म़त्रालयात प्रवेश नाकारल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.पत्रकार शासन प्रशासन आणि समाजामधील महत्वाचा समन्वयक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सेवादूत आहे.तो आपली संपूर्ण सेवा सामाजिक कार्यात अर्पण करतो.अशा दैनिकाचे ओळखपत्र किंवा कोणत्याही अधिकृत संघटनेचे सभासदत्व ओळखपत्र असणाऱ्या पत्रकारांना मंत्रालय,महत्वाची शासकीय कार्यालयांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जावा,त्यांची अडवणूक बंद करावी‌.त्याचप्रमाणे मुंबईच्या लोकल प्रवासातही अशा सर्व पत्रकारांना एवढी प्रतिक्षा आणि सहकार्यानंतर प्रवासाची मुभा द्यावी,कोरोना नियमांच्या पालनाच्या जबाबदारीची जाणीव अशा पत्रकारांना निश्चितच आहे हे अधोरेखित करून अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतिय स्तरावरील संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी गृहमंत्री मा..ना.दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री मा.ना. सतेज पाटील यांचेकडे पत्राव्दारे केली असून ती माहिती मा.महा संचालकांना ही पाठविली आहे.
शासनाच्याशेती,शिक्षण,सामाजिक,सांस्कृतिक,तांत्रिक आणि विविध क्षेत्रातील माहिती स्तव कामकाज,वृत्तांकनासाठी जाणाऱ्या अशा पत्रकारांना प्रवेश नाकारून या अडवणुकी मुळे त्यांच्या स्वातंत्र्याला कोणताही धक्का लागू नये.
  
    पत्रकार शासन,प्रशासन व समाज यांच्यातील दैनंदिन समन्वयात सुलभता निर्माण व्हावी. याकरीता गृहविभागाने या अडचणींचा प्राधान्न्याने विचार करून ही अडवणूक थांबवावी, व त्याकरीताच्या हालचालींसाठी पत्रकारांना लोकल प्रवास मोकळा करावा. अशी मागणी या तिन पत्रां मधून करण्यात आली.पत्र वाचले आणि त्याबाबत आम्ही विचार करीत आहोत अशी माहिती गृहराज्यमंत्री मा.ना. सतेज पाटील यांनी संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष संजय देशमुख यांचेशी दुरध्वनीव्दारे बोलतांना दिलेली आहे.
============================
 

Post a Comment

0 Comments