विकी भावसार,परेश उदेवाल
अमळनेर हादरलं! आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ..दवाखाने फुल
अमळनेर नगरपरिषद आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आता उघडपणे समोर येऊ लागला असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्याधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांचे दुर्लक्ष आहे की ठेकेदारांशी संगनमत? असा गंभीर प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे.
व जे घंटागाड्या नादुरुस्त आहे त्या घंटागाड्या पुन्हा मक्तेदाराकडून दुरुस्ती करण्यात येईल का की तसेच नादुरुस्त अवस्थेत दुसऱ्या मक्तेदाराला ठेका देऊन तशाच बंद पडलेल्या अवस्थेत घंटागाड्या बंद पडून राहतील का?
नगरपालिकेचा आरोग्य विभाग हा नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग असताना, प्रत्यक्षात मात्र शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले दिसून येत आहे. नाल्यांमध्ये साचलेला कचरा, रस्त्यांवर विखुरलेली घाण आणि अस्वच्छतेमुळे आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नगरपालिकेच्या तीन घंटागाड्या महिनोनमहिने नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. उरलेल्या घंटागाड्यांची स्थितीही अत्यंत दयनीय असून, त्या वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दाराशी कचरा संकलनाची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.
आरोग्य निरीक्षकांचे या सर्व प्रकाराकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अनेक भागांत वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी, डासांची वाढ आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत आहे.
दरम्यान, शहरात वाढत्या घाणीच्या सम्राज्यामुळे व ओपन जागेवरील कचऱ्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अशा वातावरणात नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
प्रश्न अनुत्तरितच…
आरोग्य विभाग नेमकं झोपेत आहे का?
की ठेकेदारांशी संगनमत करून नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे?
मुख्याधिकारी आता तरी कारवाई करणार का?
जर तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आता तरी प्रशासन जागं होणार की सकाळच्या चहातच गुंतून राहणार?
अमळनेरकरांच्या आरोग्याचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून, यावर तात्काळ कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments