मुंबई /सांगली :- आझाद नायक न्युज
मुकेश भावसार
महादेवमंदिर, महादेवनगर (वाडी) वलवा सांगली आणि प.पु.रामचंद्र डोंगरेजी महाराज प्रेरित संस्था (घाटकोपर, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने यावर्षी २०२६ पासून प्रथमच मंदिरामध्ये इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी च्या शालेय विद्यार्थ्यां साठी 'श्रीराम जप आणि चित्रकला स्पर्धेचा' कार्यक्रम रविवार, दिनांक ८/२/२०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना श्री रामनाम मंत्र लेखन वह्या आणि पेनाचे वाटप करण्यात आले.
यावेळी प.पु.रामचंद्र डोंगरेजी महाराज प्रेरित संस्थेचे (घाटकोपर, मुंबई) पदाधिकारी श्री. जयेश पारेख ,सौ. अलका पारेख आणि ग्रामस्थ श्री. कृष्णा बाबुराव मोहिते, सौ. कुसुम कृष्णा मोहिते, श्री जगन्नाथ शंकर मोहिते यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला मंदिर विश्वस्तांनी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार.
कार्यक्रमामध्ये ३० शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
श्री आनंदकुमार तुकाराम धायफुले (घाटकोपर, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. कृष्णा मोहिते यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
त्यांनी पालकांचे व विद्यार्थ्यांचे विशेष आभार व मनोगत ही मांडले.
0 Comments