अकोला:- आझाद नायक न्युज
मुकेश भावसार
12 डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हाच्या वतीने शासकीय विश्राम गृह अकोला येथे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर' म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे तसेच जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर हे होते, यावेळी त्यांच्या जीवन पठावर उजाळा देताना त्यांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून त्यांचे कार्य ,आणि त्यांच्या धम्मकार्यासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना 'सूर्यपुत्र' म्हणून त्यांना आदराने संबोधले गेले, यावेळी महानगर अध्यक्ष वैभव खडसे,अकोला तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, पातूर तालुका अध्यक्ष सम्राट तायडे ,बाळापूर तालुका अध्यक्ष सुगत डोंगरे, अकोट तालुका अध्यक्ष आशिष रायबोले, माजी महानगर अध्यक्ष जय तायडे, नितीन वानखडे, राजेश दारोकर,शुभम साऊथकर शहर प्रसिद्धी प्रमुख नागेश उमाळे, अकोला प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ, मीडिया प्रमुख सूरज दामोदर, साहिल बोदडे, सचिन शिराळे, प्रदीप इंगळे, रोशन डोंगरे, अमोल शिरसाट, बंटी बागडे, नौशाद, रणजित शिरसाट, स्वप्नील वानखेडे, शुभम साऊथकर, सचिन सरकते, आनंद शिरसाट यासह कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments