आझाद नायक न्युज :- विकी भावसार मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा : प्रभाग १८ (ब) सर्वसाधारण महिला राखीव उमेदवार
अमळनेर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८(ब) मध्ये सर्व साधारण महिला राखीव जागेसाठी लांबोळे अनिता विनोद या शनिवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाडा कॉलनी रुबजी नगर, कंजर वाडा, शिवम नगर,संत रोहिदास नगर, मरिमाता नगर,बहादरपूर नाका, संताजी चौक,भोईवाडा, माळीवाडा, अमलेश्वर नगर, शहालम नगर, शिवम नगर, या भागातील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बिरजू नानांवर प्रेम करणारे मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रुबजी नगर परिसरात सकाळी ठिक १०.०० वाजता नागरिक आणि समर्थकांनी एकत्र येऊन अनिता लांबोळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गत काळात अनिता लांबोळे यांचे पती विनोद लांबोळे उर्फ बिरजू नाना यांनी केलेल्या विकासात्मक कार्यामुळे प्रभागातील विविध भागातील महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
प्रभागातील विकासकामे, मूलभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या उमेदवार म्हणून अनिता लांबोळे यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात असून, अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडेल, यात शंकाच नाही.
0 Comments