अकोल्यातील सर्वधर्मीय महामानव जयंती उत्सव समितीच्या सौजन्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता तहसील परिसरातील ग्राउंड फ्लोअर येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. साहेबराव इंगळे (गुरुजी) भूषविणार असून, अनेक मान्यवर अतिथी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुरेश कव्हळे साहेब,( तहसीलदार अकोला )मा. गजाननभाऊ हरणे (समाजसेवक), मा. पंकज प्रदीप देशमुख (संचालक, आर.सी. न्यूज अकोला), मा. उषाताई विरक (नगरसेविका, मनपा अकोला), तसेच मा. अॅड. छगनराव खंडारे व मा. अॅड. प्रमोद एन. रौराळे (नोटरी) यांची उपस्थिती लाभणार आहे.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार, आणि बहुजन हिताय कार्य करून भारतीय समाजव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत असून, अशा महामानवांची जयंती एकत्रित स्वरूपात साजरी करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे.
कार्यक्रमाचे आयोजन देवानंद अंभोरे, अनिल वाकडे, गोपाल चौधरी, रवि विसपुते, नंदलाल सावळे, कैलास भालेराव, केवल मेश्राम, धिरज ठाकुर आणि संदीप सिरसाठ यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. सर्व स्तरातील नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये महामानवांच्या प्रतिमांना माल्यार्पण, त्यांच्या विचारांवर व्याख्याने, सामाजिक संदेशपर मनोगते यांचा समावेश असणार आहे. उपस्थितांना प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी उत्सव समितीच्या वतीने सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रम अकोल्यातील जनतेसाठी सामाजिक ऐक्य, बंधुता आणि विचार जागृती यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. आयोजकांच्या वतीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व जाती-धर्माच्या जागृत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
0 Comments