आझाद नायक न्युज प्रतिनिधी
जळगाव शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या देहविक्र व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहरातील नयनतार मार्केट मॉल येथे मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर LCBसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे दुकान नंबर ४०८ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय चालु आहे अशी माहिती LCBला मिळाली होती.
तिथे संशयित राजू मधुजी जाट (रा.कलोधिया,ता. पिंपरी जि. भीलवाडा, राजस्थान) याने डमी ग्राहकाला व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यामध्ये चार महिलांच्या मार्फत पाच सेंटरच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. त्याचा मालक विक्रम राजपाल चंदमारी धानी,वय २० वर्ष रा. चत्तरगढ पत्ती जि. सिरसा, हरियाणा हा व्यवसाया स प्रोत्साहन देत होता. म्हणून दोघांविरुद्ध PITA ऍक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅनेजर राजू जाट याला अटक करण्यात आली आहे. तर या महिलांना आशादीप महिला वस्तीगृहात पाठवण्यात आले आहे.
सदर कारवाई ही जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, स.पो.नी. शितल कुमार नाईक, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक निरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील,उपनिरीक्षक वैशाली महाजन,हे.कॉ.प्रियंका कोळी , मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments