Header Ads Widget

Responsive Image

बाळापूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार अमोल घायवट याचा नामनिर्देशन दाखल

अकोला : युवा, तडफदार, आदिवासी घटकांचा चेहरा तसेच अन्य समाजात ही आपल्या कार्य प्रणालीने ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ता अमोल घायवट बाळापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणुक लढवित आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या घायवटांनी गेल्या पाच वर्षात सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे.आदिवासी घटकांपासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात करत आता त्यांनी सर्व जाती-पातीत आपली वेगळी छाप पाडली. त्यामुळे दस्तुरखुद्द मतदारांकडूनच 'बदल हवा तर चेहरा नवा' असा आवाज उठत असल्यामुळे अमोल घायवट यानी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही माझी नव्हे तर बाळापूर मतदार संघातील मतदारां ची उमेदवारी आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्यांची उमेदवारी दिग्गजांपुढे आव्हान ठरणार असल्याचे मतदारांतून बोलले जात आहे.
 अमोल घायवट पातुर तालुक्यातील जांब येथील रहिवासी असून, ते युवा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्यांना हात घालून निराकरणही केले आहे. घरकूल योजना, शेतकरी प्रश्न, सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रश्न, पाणी पुरवठा, सिंचन आदी समस्यांवर त्यांचे कार्य आहे. त्यांनी बाळापुर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा संकल्प केला आहे. मतदारांनीदेखील त्यांच्या संकल्पाचे स्वागत केले असून, तन-मन-धनाने साथ देण्याचे आश्वासीत केले आहे.  
अमोल घायवट म्हणाले, विकास हीच प्राथमिकता आहे. जात, धर्म, पंथ, प्रांत या सर्व मुद्यांना स्थान न देता, केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहे. आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती, उद्योग, शेती, महिला सक्षमीकरण, आणि पायाभूत सुविधा या मुद्यांना प्राथमिकतेने हाताळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
गलिच्छ राजकारण नव्हे तर नागरिकांच्या समस्यांवर काम करण्यास प्राधान्य असेल, असे ते म्हणाले. दरम्यान, अमोल घायवट यांच्या उमेदवारीचे त्यांच्या समर्थकां नी, चाहत्यांनीदेखील त्यांचे स्वागत केले आहे. त्यांच्या उमेदवारीची बाळापुर विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु असून, त्यांच्या पारड्यात अधिकाधिक मत पडले जाईल, अशाही प्रतिक्रीया उमटत आहेत.
तरुण मतदारांची फळी अमोल घायवट यांच्या समर्थकांमध्ये तरुण मतदारांची मोठी फळी कार्यरत असून, गेल्या पाच वर्षापासून ही फळी जोमाने कार्य करीत आहे. 
त्यामुळे अमोल घायवट यांच्या उमेदवारीला बळ मिळणार असून, मतदार संघातील राजकीय समिकरण निश्चिच बदलेल, असा जाणकारांतून बोलले जात आहे. त्यांचा उद्देश सामाजिक परिवर्तन आणि विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणे असून, त्यांच्या उमेदवारीची बाळापुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांमध्ये मो'ठया प्रमाणावर उत्सुकता आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर तुर्तास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मतदार सांगत आहे. त्यामुळे बाळापूर विधानसभा मतदार संघातील राजकारण ढवळून निघण्याचे चिन्हे आहेत.
मतदार संघातील राजकारण ढवळून निघेल? आदिवासींसह अन्य प्रवर्गात उत्साहाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments