अकोला : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वीचे आठ दिवस दि. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून ते दि. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वा. पर्यंत निवडणूक निकालांचे अंदाज प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments