यासाठी विद्यालयातील वर्ग पाच ते दहाच्या सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत दिवे तयार करणे ,आकाश कंदील तयार करणे, पणत्यां तयार करणे किल्ला तयार करणे तसेच तसेच ग्रीटिंग कार्ड व शुभेच्छापत्र तयार करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या सोबतच दिवाळीच्या सणानिमित्त विद्यार्थ्यां साठी फराळाचे वाटप करण्यात आले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांना जिलेबी चिवडा देऊन सर्वांची तोंड गोड करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भारसाकळ सर तसेच पर्यवेक्षक श्री खंडारे सर यांच्या उपस्स्थितीत आयोजन कु. झटाले मॅडम, श्री मोरे सर कलाशिक्षक यांनी केले तसेच यासाठी कु. बाळसराफ मॅडम कु. गवई मॅडम कु. झाकडे मॅडम , कु. झटाले मॅडम तसेच सर्व वर्ग शिक्षकां नी विविध प्रतिकृती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री खंडारे सर यांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त, धूरमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शन विद्यार्थ्यांना बघण्यासाठी खुले करण्यात आले अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
0 Comments