Header Ads Widget

Responsive Image

विश्वशांती बुद्धविहार भिमनगर बोरगांव मंजू येथे ग्रंथ वाचनाचा सांगता समारोह


बोरगांव मंजू - भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा अशा तीन महिन्याचे कालावधीत भिम नगर बोरगांव मंजू येथील विश्वशांती बुद्ध विहारात दि. २४ ऑक्टोंबर २०२४ गुरुवार रोजी ग्रंथ वाचनाचा समारोप करण्यात आला.
  ग्रंथ वाचक बौद्धाचार्य नानासाहेब गवई यांनी उत्कृष्ट ग्रंथाचे समारोपीय वाचन केले असून ग्रंथ विश्लेषक अभ्यासक दृष्ट्या ग्रंताचे विश्लेषन केले. ग्रंथातील समारोपीय भागातील भगवान बुद्धाचे महापरीनिर्वाण व सुभद्र परिव्राजका ची दिक्षा या महत्वपूर्ण विषयाचे सखोल वाचन करुन ग्रंथ वाचनाचा समारोप करण्यात आला. 
तथागत भगवान गौतम बुद्धाचे वैशाख पौर्णिमेला तिसऱ्या प्रहरी महापरिनिर्वाण होणार अशी वार्ता पसरताच सुभद्र परिव्राजकास अंतीम इच्छा होती की, मला तथागत भगवान बुद्धांनी दिक्षा द्यावी अशी याचना भंते आनंदाकडे सुभद्रांनी व्यक्त केली परंतु आनंदानी तथागतांना भेटण्यास मनाई केली. आनंद आणि सुभद्रांचा प्रदीर्घ संवाद चालु असतांना भगवंतांनी भंते आनंदास आदेशित केले की, सुभद्रास मला भेटीकरिता आत येवू दे सुभद्राचा आग्रह पाहता अंतीमत: तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुभद्रास दिक्षा दिली. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंताचे तीन महिन्याचे कालावधीतील ग्रंथ वाचनाचे समारोपीय वाचन करण्यात आले. ग्रंथ समारोपीय मंगलप्रसंगी आयु.धनराजजी गवई, रामरावजी खंडारे, अशोकराव गवई, गौतम बागडे, साहेबराव बागडे, रणजित गवई, राजु खडे,रवि बागडे, सुरेश गवई यासह सुजाता महिला संघ इत्यादी उपासक-उपासिका व बाल बालीकांनी भिम नगरातील युवक युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments