जन्माष्टमीच्या दिवशी मंजूरात मिळाल्याने हिवरखेड वासियांचा आनंद द्विगुणित
प्रतिनिधी :-
जन्माष्टमीच्या दिवशी हिवरखेड वर श्रीकृष्ण प्रसन्न झाला असून महाराष्ट्र शासनातर्फे हिवरखेड नगरपरिषदसाठी कोट्यावधी रुपयांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पाच नवनिर्मित नगरपंचायत व नगरपरिषदांसाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा आकृतीबंध मंजूर केला आहे
ज्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एकमेव हिवरखेड नगरपरिषदचा समावेश आहे. तर उर्वरित चार मध्ये नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद डिगडोह, निलडोह, कोंढाळी, आणि (बिडगाव-तरोडी खुर्द) पांढुर्णा या नगरपंचायतींचा समावेश आहे.
एकट्या हिवरखेड साठी वार्षिक आवर्ती खर्च अनुदान 1,37,56,805 रुपये (1कोटी 37 लक्ष 56 हजार 805 रुपये) दरवर्षी करिता मंजूर झाले आहेत.
हिवरखेड नगरपरिषदसाठी एकूण 28 पदे निर्माण करण्यात आली असून मुख्याधिकारी (अ वर्ग) 1, स्थापत्य अभियंता 1, जलदाय स्वच्छता अभियंता 1, लेखापाल, लेखापरीक्षक 2, कर निर्धारक प्रशासकीय सेवा 3, नगर रचनाकार 1, स्वच्छता निरीक्षक 1 असे 10 अधिकारी आणि लिपिक 7, चालक 1, पंप ऑपरेटर वीज तंत्रज्ञ 3, वायरमन तारतंत्री 1, शिपाई 3, मुकादम 2, व्होल्व्हमॅन 1 असे 18 कर्मचारी असे एकूण 28 मोठी पदे मंजूर करण्यात आली असून एव्हडेच नव्हे तर प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे एक स्वच्छता कामगार अशी भरभरीत पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव अशोक काशिनाथ लक्कस यांच्या स्वाक्षरीने सदर महत्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आला आहे.
प्रतिक्रिया:-
हिवरखेड नगरपरिषद साठी कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिक संघर्ष करणाऱ्या सर्व संघर्ष कर्त्यांच्या संघर्षाला आता फळ येत असून आता हिवरखेड विकासाच्या मार्गावर आहे.
राहूल गिऱ्हे, धिरज बजाज सामाजिक कार्यकर्ता हिवरखेड.
0 Comments