Header Ads Widget

Responsive Image

रूढी परंपरांना फाटा देत जपली सामाजिक बांधिलकी

घराच्या वास्तुपूजन ऐवजी सेवा निवृत्त मुख्याध्यापकांनी केले शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
सर्व स्तरातून होत आहे कौतुकाचा वर्षाव.
धिरज बजाज हिवरखेड :- अकोला जिल्ह्यातील हिवरखेड रुपराव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामेश्वर पाडुरंगजी भोंगाळे यांनी एक आनोखी देणगी सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिर हिवरखेड या शाळेला दीली. ती म्हणजे भोंगाळे गुरुजींनी आपल्या नविन घराच्या वास्तु पुजनाच्या पारंपारीक प्रथेला पुर्णविराम देऊन त्यानिमीत्त शाळेतील सर्व म्हणजे 250 च्या वर विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा निर्णय घेतला. 
खरोखर आजच्या युगात असं दानशुर व्यक्तीमत्व क्वचितच पहायला मिळते. त्यांचा चा हा विचार खरोखरच स्तुत्य आहे. त्यापासून समाजातील इतर सक्षम व्यक्तींनी प्रेरणा घेतली पाहीजे. यानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन समाजात अशा नविन घराची वास्तु पुजा ऐवजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी वास्तु पूजन साठी येणाऱ्या खर्चातुन एक अनोखी भेट गावातील विद्यार्थ्यांना देत समाजासमोर एक आर्दश उभा करणाऱ्या सेवानिवृत मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करुन आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यां मध्ये अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला. या आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन संस्थाध्यक्ष रमेशचंद्र गुप्ता,
विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामेश्वर भोंगाळे सर, प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव सतिष राऊत, संचालक अनिल कराळे, अशोक वानखडे, अरुण कवळकार, सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी सुभाष राऊत, डॉ.प्रशांत इंगळे, शा.व्य. समिती अध्यक्ष गजेंद्र वाली, संतोष भगतआरोग्य सल्लागार सौ.मोनिका भोंगाळे, शाळेचे मुख्याध्यापक अमोल भोंगाळे, सौ.राऊत मँडम (प. शी.), सहाय्यक शिक्षक सोळंके सर, अनिल कवळकार सर, धारपवार सर व पालकवर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी सेवा निवृत्त मुख्याध्यापक रामेश्वर भोंगाळे यांचा शाळा प्रशासनाकडुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेट्टे सर, प्रास्ताविक धर्माळ सर, व आभार प्रदर्शन अनिल कवळकार सर यांनी केले. जुन्या रूढी परंपरांना फाटा देऊन त्यावर होणारा लक्षावधी रुपयांचा खर्च सामाजिक बांधिलकी जोपासत भोंगाळे सरांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या गणवेश वाटप या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अनेकां साठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments