साहेबांनीच पाणी सोडण्यासाठी केली मनाई...
अमळनेर :- आझाद नायक न्युज ,पंकज भावसार
नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागते वण वण
अमळनेर नगरपालिका मधील वाढीव वस्ती राजाराम नगर मध्ये 3600 रुपये पाणीपट्टी असूनही काही एक न बोलणारे नागरिकच पिण्याच्या पाण्यापासून वंचित...
या भागातील 201 घरांपैकी बाकी लोकांची नळ कनेक्शन घेतले आहे बाकी लोकांनी नळ कनेक्शन घेतले नाहीं पुढे ते घेतली पण ?
पण मागच्या पाच - सहा वर्षां पासून नगरपालिका तर्फे सक्तीची वसुली या भागात झाली नाही आणि आता 201 घरापैकी 80/85 घरांचे नळ कनेक्शन व नळपट्टी ही नियमित असुन देखील वेळेवर पाणी न मिळणे हा कुठला न्याय...
सात दिवस होऊन ही पाणी या भागात सोडण्यात आले नाही.
लोक ऊन्हा तान्हात पाणीसाठी वण वण भटकत आहेत.जर उन्हामुळे काही दुर्दैवी घटना घडली तर याला जबबदार कोण असेल ?
201 घरांपैकी बाकी घरांची नळ कनेक्शन आहे बाकी लोकांच नाही तर नगरपालिकेने आम्हाला 30 मे पर्यंत नाही तर 15 जुन पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.
या मुदत्ती नंतर ज्या घराची नळ कनेक्शन नसेल ते स्वतः नगरपालिके ने बंद करावे ही नम्र विनंती परिसरातील नागरिकांनी केली आहे.
त्या लोकांमुळे बाकीचे नियमित नळपट्टी भरणारे लोकांना नाहक त्रास नगरपालिकेने देऊ नये.
पहिले पासून सक्तीची वसुली केली असती तर असे झाले नसते.
नगरपालिकेचे कर्मचारी सांगतात तुमचा भागात पाणी सोडण्यात येणार नाही आम्हाला साहेबांनी नाही सांगितले आहे. हे कोणते साहेब आहेत जे पाणी सोडण्यात मनाई करत आहेत.
असं कस तुम्ही पाणी बंद करू शकतात तुम्ही मागील 5/6 वर्षा पासून सक्तीची वसुली केली असती तर आज हा दिवस आला नसता तुम्ही जे नळ कनेक्शन अनअधिकृत आहे ते तुम्ही ते बंद करा आणि योग्य तो दंड द्या.
साहेबांना राजाराम नगर भागातील नागरिकांची एकच विनंती आहे
त्यांनी आम्हाला 15 जून पर्यंत मुदत देण्यात यावी व आपले कर्मचारी पाठवून कोणाचे नळ कनेक्शन अधिकृत आहे कोणाचे नळ कनेक्शन अनअधिकृत आहे हे बघा बाकी लोकांमुळे दुसऱ्यांना त्रास नको
राजाराम नगर भागात पाणी सोडण्यात यावे अशी विनंती राजाराम नगर वासियांनी केली आहे.
0 Comments