( विकी भावसार )
लायन्स क्लब अमळनेर तर्फे मुख्य बाजारात थंडगार जारच्या पाण्याची पाणपोई उभारण्यात आली असून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
एप्रिल महिन्यातच कडक ऊन जाणवू लागल्याने तहानलेल्याची तहान भागवता यावी व थंड पाणी पिऊन तृप्त व्हावे या हेतूने लायन्स क्लब अमळनेर तर्फे बाजारपेठेतील पंजाब नॅशनल बँके शेजारील चौकात पाणपोईची सोय करण्यात आली आहे.
याप्रसंगी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी लायन्स क्लबच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
शहरातील बस स्थानक भागात देखील एक पाणपोई लवकरच सुरू करणार असल्याचे क्लबचे प्रेसिडेंट योगेश मुंदडा यांनी सांगितले.
या ठिकाणी रोज १०० थंडगार जारची व्यवस्था केली जाणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट योगेश मुंदडा , सेक्रेटरी महावीर पहाडे, विनोद अग्रवाल,पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,डॉ युसुफ पटेल,डॉ मिलिंद नवसारीकर,प्रदीप अग्रवाल, जितेंद्र जैन,पंकज मुंदडा,विजय पारख,प्रशांत सिंघवी,लालु सोनी, सुशील पारख,मनीष जोशी,दिलीप गांधी,दिनेश मणियार, उदय भाई शाह, सुशील जैन,महेश पवार,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, सोमचंद संदानशिव,लिओ प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल,गौतम मुंदडा, किशोर गोलेच्छा आदी उपस्थित होते.
0 Comments