Header Ads Widget

Responsive Image

शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ होवून समृद्धी साधावी-उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील(भूमिपुञ कृषी पर्यटन केन्द्राचे उदघाट्न )

शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ होवून समृद्धी साधावी-उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील(भूमिपुञ कृषी पर्यटन केन्द्राचे उदघाट्न )
अकोला.आझाद नायक न्युज, मुकेश भावसार 

शेती हा स्वतः करण्याचा व्यवसाय असून विविध प्रयोगाने शेती करावी.शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ होवून आपली आर्थिक व सामाजिक समृद्धी साधावी,असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते पाटील यांनी केले.ते सिरसो येथील भूमिपुञ कृषी पर्यटन केन्द्राच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय द्वारा मान्यताप्राप्त व जयदीप सोनखासकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूमिपुञ कृषी पर्यटन केन्द्राचे उद्घाटन संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था श्री क्षेत्र श्रध्दासागर अकोट चे अध्यक्ष हभप वासुदेवराजी महल्ले यांच्या शुभहस्ते पूजनाने व श्रीफळ फोडून तसेच फीत कापून करण्यात आले.याप्रसंगी बोलताना त्यांनी उपक्रमाला शुभाशिर्वाद प्रदान केले.
      प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी श्रीमती अमृता काळे,श्रीमती निर्मला सोनखासकर पोलीस उपनिरिक्षक मनोहर वानखडे,शेतकरी जागर मंचचे अध्यक्ष प्रशांत गावंडे,जेष्ठ समाज सेवक गजानन हरणे,आक्रमण संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष सुरज मेश्राम,गुरूदेव सेवा समीतीचे तालुकाध्यक्ष बबनराव देशमुख मंडळ कृषी अधिकारी व्हि.आर.गोरे, एस.जे.बेंडे व मान्यवर उपस्थित होते.सर्वांचे स्वागत केन्द्र संचालक जयदीप सोनखासकर यांनी केले.
    कार्यक्रमाला निमंञीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments