Header Ads Widget

Responsive Image

अकोला येथे रामनवमी शोभा यात्रा व मोटारसायकल रॅली ने जल्लोषात साजरी.......

अकोला :- आझाद नायक न्युज
अकोला येथे रामनवमी शोभा यात्रा व मोटारसायकल रॅली ने जल्लोषात साजरी.......
रामनवमी म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मदिवस .. 
या रामनवमीचा औचित्य साधून अकोला शहरात भव्य मोटर सायकल मिरवणूक रॅली काढण्यात आली राज राजेश्वर मंदिर येथून करण्यात आली  जेव्हा जेव्हा जगात अधर्म वाढतो आणि वाईट शक्ती निसर्गाच्या नियमांची उलथा-पालथ करू लागतात, अशा स्थितीत देव अवतार घेतो... मानव जातीसाठी युगानु युगे अनुकरणीय ठरेल अशा पद्धतीने वागण्याने  अयोध्येत अवतरले होते..
प्रत्येक पुरुषात प्रभू रामचंद्र सारखा चरित्र असावा या भावनेचा संदेश देऊन आज अकोला शहरात जुने शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिर येथून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली ही रॅली खोलेश्वर रोड,जिल्हाधिकारी कार्यालय रोड, अशोक वाटिका,या मार्गे नवीन बस स्टॅन्ड अशा शहरातील विविध भागात ही  करण्यात आली सदर रॅलीची समारोप सिटी पोलीस स्टेशन समोरील राम मंदिर येथे करण्यात आला.
सदर या रॅलीला बाळापूर विधान सभेचे आमदार नितीन देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांच्यासह हजारो राम भक्त या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
तसेच संध्याकाळी गांधी रोड येथे भव्य यात्रेचे स्वरूप येणार आहे.
व बाजारात विविध प्रकारचे लहान मुलांचे खेळणे, रामफळ, डवणे, उपलब्ध झाले आहेत.
अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन

Post a Comment

0 Comments