Header Ads Widget

Responsive Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नामांतरासाठी दिले निवेदन

अमळनेर :-विकी भावसार

अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे नाव देण्यासाठी तहसीलदारानां निवेदन...

येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजबांधवांतर्फे अहमदनगर  जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारले. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा जन्म झाला. सीना नदीकाठी वसलेल्या या गावात धनगर समाजाचे दैवतांचा जन्म झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे.या नामांतर करता संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रा व मोर्चे समाज बांधवांनी काढले आहेत. 

राज्यातील समाजबांधवांची नामांतरची मागणी आहे. महाराष्ट्रा तील धनगर समाजाच्या भावना लक्षात घेऊन अहिल्या नगर नामकरण व्हावे, अशी मागणी धनगर समाजा कडून करण्यात येत आहे.

या वेळी अध्यक्ष बन्सीलाल भागवत, उपाध्यक्ष नितीन निळे,सचिव एस.सी. तेले,कार्याध्यक्ष डी.ए.धनगर, संघटक प्रभाकर लांडगे,उपाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे,हमाल मापाडी संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश शिरसाठ, मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाठ,युवा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवा लांडगे, धानोरा सरपंच दिलीप ठाकरे,निंभोरा उप सरपंच आलेश धनगर,प्रदीप कंखरे, जयप्रकाश लांडगे,शशिकांत आढावे, प्रताप धनगर,तुषार इदे,सचिन शिरसाट ,जितेंद्र धनगर, अनिल धनगर, भाऊलाल पाटील,सुनील पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments