अकोला आझाद नायक न्युज :-
मुकेश भावसार
संमेलनाध्यक्ष म्हणून सृप्रसिद्ध कवी, ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची निवड करण्यात आली आहे. तर सुप्रसिद्ध कवी आणि सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत, अशी माहिती गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गझलनवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस लॉन्स येथे हे दोन दिवसीय गझल संमेलन पार पडणार आहे. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी, अकोला यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या या संमेलनाचे उदघाटन ७ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार, लेखक व विचारवंत सुरेश द्वादशी वार उपस्थित राहणार आहेत.
0 Comments