सकल जैन समाजा तर्फे अंमळनेर तहसीलदार यांना निवेदन
अंमळनेर :- झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी हे सकल जैन समाजाचे सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असून, जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. केंद्र शासनाने या स्थळाला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्या ऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी येथील सकल जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी हे सकल जैन समाजाचे सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र असून, जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. केंद्र शासनाने या स्थळाला पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित करण्याऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी येथील सकल जैन समाजातर्फे मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या वेळी आचार्य भगवंत श्री जीनमणी प्रभूसुरीश्वरजी, श्री सूर्यप्रभाश्रीजी, श्री मधुरी मा.श्रीजी तसेच मोर्चात शीतलनाथ जैन संघाचे अध्यक्ष महेंद्रलाल कोठारी, स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष दीपचंद खिंवसरा, दादावाडी जैन संघाचे अध्यक्ष संजय गोलेच्छा, ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष घेवरचंद कोठारी, गिरुवाजी पार्श्वनाथ जैन संघाचे अध्यक्ष डॉ. किशोर शहा, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जैन, भारतीय जैन संघटना खानदेश विभागाचे अध्यक्ष विनोद खिंवसरा, शिरसाळे दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष उपेंद्र जैन, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जैन, प्रकाश शहा, मदनलाल ओस्तवाल, अशोकचंद डागा, भिकचंद छाजेड, अशोक छाजेड, सुभाषचंद्र लोढा, प्रकाशचंद पारख, प्रसन्नचंद्र बाफना, तिलोकचंद गोलेच्छा, रोनक संकलेचा, विपूल मुणोत, महावीर पहाडे, जितेंद्र जैन, बजरंगलाल अग्रवाल, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, शिरसाळा जैन संघाचे पदाधिकारी योगेश जैन, महेश जैन, अमित जैन, श्रेणीक शहा, वीरेंद्र जैन, मोहन जैन तसेच सकल जैन समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments