वन विभागाने तातडीची मदत करणे आवश्यक
हिवरखेड प्रतिनिधी:- धिरज बजाज
इंदिरानगर (गिऱ्हे नगर) हिवरखेड येथे काळ्या आक्रमक माकडाने महिलेवर प्राण घातक हल्ला केला.
त्यामध्ये माळेगाव येथील बेबीबाई गवई हि महिला गंभीर जखमी झाली असून नागपूर येथे तिची आठवडाभरा पासून मृत्यूशी झुंज सुरू आहे. महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून वन विभागाने व शासनाने त्यांना तातडीची मदत करणे अत्यंत आवश्यक आहे.
सविस्तर असे की तेल्हारा तालुक्या तील माळेगाव बाजार येथील रहिवासी सौ बेबीबाई विश्वास गवई ह्याहिवरखेड इंदिरानगर येथील आपली बहीण सरस्वती नानाराव इंगळे यांचेकडे भेटीला आल्या होत्या. बेबीबाई घराच्या छतावर कपडे वाळविण्या साठी गेल्या असता तेथे तीन ते चार काळ्या माकडांची चमू ठाण मांडून बसली होती. त्यातील एका मोठ्या काळ्या आक्रमक माकडाने त्यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला केला व त्यांना गच्चीच्या गॅलरीतून खाली ढकलले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. हि घटना दी 23 नोव्हेंबर रोजी घडली.
त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम हिवरखेड येथे व नंतर तात्काळ अकोला येथे रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठविले. सुरुवातीला अकोल्यातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले परंतु रिपोर्ट पाहून त्यांनी त्यांच्या पाठीच्या हाडांमध्ये मल्टिपल फ्रॅक्चर असल्याचे सांगून त्यांना कमरे वर एक पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्या साठी नागपूर येथील जीएमसी रुग्णालयात पाठविले.
तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कमरेमध्ये गंभीर दुखापतीमुळे बसता उठता येत नाही त्यांचे वय अंदाजे 50 च्या दरम्यान असून ह्या दुखण्यामुळे त्यांना आयुष्यभरासाठी अपंगत्वा सारखी स्थिती आली आहे. बेबाबाईंच्या घरची व नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचा उदरनिर्वाह त्या शेतमजुरीला जाऊन करतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यापुढे उठता बसता येणार नाही अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यामुळे शासनाने आणि वनविभागा च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हि बाब गंभीरतेने घेऊन त्यांना उपचारासाठी व पुढील उदरनिर्वाहासाठी तातडीने आर्थिक मदत करावी व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अशी लेखी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे संबंधितांना केली आहे.
प्रतिक्रिया
पुन्हा कोणावर हल्ल्याची घटना घडू नये म्हणून हल्ला करणाऱ्या काळ्या माकडांचा बंदोबस्त वनविभागाने तात्काळ करावा. आणि माझ्या मावशीच्या उपचार आणि उदरनिर्वाहासाठी शासनाने तात्काळ मदत मिळवून द्यावी.
प्रफुल्ल नानाराव इंगळे, नातेवाईक हिवरखेड.
0 Comments