Header Ads Widget

Responsive Image

शहरातील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य फुड कार्निवलचे आयोजन संपन्न

अमळनेर :- आझाद नायक न्युज

विद्यार्थ्यांनी बनविले विविध प्रकारचे पदार्थ 

अमळनेर शहरातील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य फुड कार्निवलचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा ॲड.ललिता पाटील ,सचिव प्रा. श्याम पाटील संचालक पराग पाटील, प्राचार्य विकास चौधरी सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून डॉ प्रतिभा मराठे, प्राचार्य प्रकाश महाजन सर यांनी काम पाहिले.

फुड कार्निवल मध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पंचपकवांनांसहित वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून त्यांच्यातील कलागुण दर्शविले. शाळेच्या उपस्थित शिक्षकांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
विविध पांचपकवांनाचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांमधील त्यांच्या हातून बनविलेले पदार्थ खूपच चविष्ट व मजेदार होते. उपस्थित मान्यवरांनी व परीक्षकांनी याचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले परीक्षकांनी सर्व स्टॉलवर भेट देऊन विद्यार्थ्यांकडून त्यांच्या बनवलेल्या पदार्थांची माहिती जाणून घेतली व परीक्षकांनी पहिले तीन उत्कृष्ट स्टॉलची निवड केली. विद्यार्थ्यांनी स्वखुशीने जास्तीत जास्त संकेत फुड कार्निवल मध्ये सहभाग नोंदवला तीस स्टॉल्स यावेळेस विद्यार्थ्यां मार्फत लावण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष ॲड.ललिता पाटील यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्फत बक्षीस दिले. प्राचार्य विकास चौधरी सर यांनी सर्व मान्यवरांचे परीक्षकांचे व उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments