अकोला :- मुकेश भावसार
आज दि.२५ नोव्हेंबर रोजी आरोग्य नगर, कौलखेड येथील वंडर किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकरिता शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला मार्फत वाहतूक नियम याबाबत प्राथमिक प्रशिक्षण कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूकिचे प्राथमिक शिक्षण व नियमा बाबत अवगत करून रस्त्यावर कसे चालावे, रस्ता कसा ओलांडावा ट्राफिक सिग्नल कसे असतात. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
श्री. विलास पाटील,पोलीस निरीक्षक , शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचे मार्गदर्शनात वाहतूक शाखा येथे कार्यरत असलेले महिला पोलीस अंमलदार दिपाली नारनवरे व महिला पोलीस अंमलदार अश्विनी माने यांनी प्रशिक्षणाकरिता उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व नियंत्रण बाबत प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षण शिबिरा करिता एनसीसी चे एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.
0 Comments