Header Ads Widget

Responsive Image

अकोला ऑटो चालकांना दिली नियमावली... कायदे मे रहेंगे तो फायदे मे रहेंगे

अकोला शहरात ऑटो चालविताना नियमांचे पालन करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांचे ऑटोधारकांना आवाहन

शहर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये घेण्यात आली ऑटो चालकांची बैठक

अकोला :-   मुकेश भावसार

अकोला शहरातील वाहतूक सुविधा सुचारु तसेच सुरळीत राहावी या करिता आज उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला शहरातील ऑटो चालकांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालयात घेण्यात आली, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांनी अकोला शहरातील ऑटो चालकांना नियमांचे तंतोतंत पालन करीत शहरात ऑटो चालवावे तसेच ऑटो चालवताना गणवेश,बॅच बिल्ला याचा वापर करावा यासोबत शहरात ऑटो चालविताना सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता काळजी घ्यावी.
 तसेच शहरातील प्रमुख चौकातील सिग्नलच्या नियमांचे पालन करावे, नियमानुसार ऑटो हा दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच उभा करावा, ऑटो चालकांनी ऑटो चालविताना वाहना संदर्भात संपूर्ण कागदपत्र सोबत ठेवावे अशा सूचना उपविभागी य पोलीस अधिकारी यांनी ऑटो चालकांना दिल्या, यावेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील,पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांच्यासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तसेच अकोला शहरातील ऑटो चालक,मालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी त्यांना आपला खाकी गणवेश परिधान करून त्यावर बैच बिल्ला लावावा, लायसेन्स मूळ कागदपत्रे सोबत ठेवावे अवैध प्रवासी वाहतूक करू नये, ऑटोच्या इंधनात भेसळ करू नये, CNG गँस भरताना अधिकृत डीलर कडूनचं भरावा ग्राहकांकडून जास्त प्रवासी भाडे वसूल करू नये,दिलेल्या पार्किंग स्थळीच ऑटो पार्क करावेत प्रवासी घेणे करिता बसस्टॅन्ड,रेल्वे स्टेशन मध्ये जावून आरडाओरड करू नये,ऑटो मध्ये काही वस्तू राहिल्यास पोलिसां कडे जमा करावी, संशयित व्यक्ती वस्तू घटनाबद्दल पोलिसांना माहिती द्यावी.
व इतर गोष्टीबद्दल सर्व ऑटो चालकांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments