Header Ads Widget

Responsive Image

सावता परिषद ही माळी समाजाचे सक्रीय संघटन असणारी राज्य व्यापी संघटना..... प्रा. हुशे

सावता परिषद ही माळी समाजाचे सक्रीय संघटन असणारी
राज्यव्यापी संघटना..... प्रा. हुशे 

अकोला : मुकेश भावसार
अकोला येथील सर्किट हाऊस (विश्राम गृह ) येथे सावता परिषदेची बैठक प्रा. संतोष हुशे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
यावेळी सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील माळी समाजाच्या एकीची वज्रमुठ बांधली जात असल्याचे प्रतिपादन प्रा.संतोष हुशे यांनी येथे केले. संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शना नुसार सुरु असलेल्या संपर्क अभियाना ची अकोला येथे जिल्हा बैठक प्रसंगी ते बोलत होते.
सावता परिषदेची अकोला जिल्ह्याची बैठक प्रा.संतोष हुशे यांच्या अध्यक्षते खाली सर्किट हाऊस येथे संपन्न झाली.यावेळी बोलताना प्रा.हुशे म्हणाले की सावता परिषद ही माळी समाजाचे सक्रीय संघटन असणारी राज्यव्यापी संघटना आहे. राज्यातील माळी समाजाचे दिशादर्शक संघटन आहे.या माध्यमातून समाजाचे ऐक्य निर्माण होत आहे. याबैठकी प्रसंगी प्रदेश सहप्रवक्ते नाना आमले ,मार्गदर्शक प्रकाशजी दाते,निलेश
नगापुरे, प्रा.श्रीराम पालकर, दिनेश सोळंके, वरुण ढोणे, गणेश गोलाईत, निलेश लांडगे,प्रविण निलखन, प्रभाकर बोळे,गजाननराव वानखडे लक्ष्मण निखाडे प्रविण वाघमारे,हरिष नावकार,रामदास खंडारे,बाळकृष्ण काळपांडे, सुनिल उंबरकार,दिलीप दाते, गणेश काळपांडे,विभा बोळे, श्रीकांत डाहे, ऋषी आमले, अशोक गाडगे,महेद्र काळे, गजानन धामणकर उपस्थित होते. संचालन प्रा.श्रीराम पालकर,प्रास्तविक प्रविण वाघमारे, आभार प्रदर्शन लक्षमणराव निखाडे यांनी केले.
 यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सुचनेनुसार अकोला जिल्ह्यात गावागावत प्रत्येक तालुक्यात सावता परीषदेची बांधणी करणार अशी नवनियुक्त पदाधिकार्यानी निर्धार केला.
कार्यक्रमाला सावता सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments