अकोला :- मुकेश भावसार
गुलाम मोहसीन
तसेच त्यांचेकडून 278 ग्रॅम सोने, किंमत 13 लाख 90 हजार, दोन मोबाईल, एक मोटारसायकल असा एकूण 15 लाख 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय 29), दीपक रमेश शिरसाट (वय 26, रा. वरखेडी, जि. जळगाव, लोकेश मुकुंद महाजन, रा. जळगाव) यांनी संगनमत करुन जळगाव येथून मोटार सायकलीने अकोला येथे येऊन चोऱ्या केल्या. यांच्या विरुद्ध खदान हद्दीत एकूण 3 गुन्हे, रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीत 2 गुन्हे, पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत 2 गुन्हे, पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत 2 असे गुन्हे दाखल आहेत.
CCTV फुटेजच्या आधारे जळगाव पोलिसांच्या मदतीने या दोघांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 23 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


0 Comments