अमळनेर : मुकेश ( विकी ) भावसार
अमळनेर शहरात लाच घेवुन उष्ट खाण्याची कीड लागली आहे ती केव्हा बंद होणार?... काही चिरीमिरी घेऊन अवैध धंदे देखील अमळनेर मध्ये वाढत आहेत यात अवैध दारू, सट्टा, तसेच विविध भागात देहविक्री देखील जोरात चालु आहे काहींच्या कृपा आशीर्वादाने तर काही उष्ट खाऊन अवैध धंदे अमळनेर मध्ये जोर धरित आहेत... असाच प्रत्येय काल आला...
अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेले डंपर कारवाई विना सोडून देण्याच्या बदल्यात दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी आणी स्विकार केल्याप्रकरणी तलाठ्यासह मंडळ अधिका-यावर ACB च्या पथकाने कारवाई आहे.
गणेश राजाराम महाजन (46), रा नविन बस स्टॅन्ड, पाळधी, ता. धरणगाव, व अमळनेर शहर तलाठी दिनेश शामराव सोनवणे (48) रा. फरशी रोड, अमळनेर असे अमळनेर मंडळ अधिका-याचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदाराचा अमळनेर शहरासह तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे तिन डंपर आहेत. याशिवाय करारनामा तत्वावर त्यांनी तिन डंपर विकत घेतले आहेत. अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे दोन महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे ते डंपर जमा करण्यात आले होते. या डंपरवर कारवाई न करता ते सोडून देण्याच्या मोबदल्यात तलाठी गणेश महाजन आणि मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे या दोघांनी तक्रारदाराकडे दिड लाख रुपयांची मागणी केली होती. लाचेची रक्कम स्विकारतांना तलाठ्यास ACB पथकाने रंगेहाथ पकडले असून दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
अमळनेर मध्ये अश्या कामांसाठी ओली पार्टी देखील करतांना काही कर्मचारी दिसत असतात..
डीवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौ. दिनेशसिंग पाटील, सहा.फौ.सुरेश पाटील , पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे , म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन,पो.ना.बाळु मराठे, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.प्रदिप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ. सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
0 Comments