आझाद नायक न्युज :- मुकेश भावसार
अकोला रेल्वे पोलिसांची दमदार कामगिरी......
अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 2 रोजी मुंबई- अमरावती एक्स्प्रेसमध्ये लॅपटॉप व बॅग चोरीला गेली.
याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि प्लॅटफॉर्म क्र. 1 ते नवजीवन एक्स्प्रेस या गाडीतील 3 हँडपर्स पर्स चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी नंदुरबार रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही घटना अकोला रेल्वे स्थानकांतर्गत घडत असल्याने पुढील तपासासाठी दोन्ही गुन्ह्यांची वर्गवारी अकोला रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्श नानुसार प्रभारी अधिकारी यांनी सहकार्य केले.
पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे आणि आरपीएफचे निरीक्षक युनूस खान यांनी तपास सुरू करून संपूर्ण प्रकरणाचा शोध सुरू केला.
या दोघांही गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू होता,दरम्यान गोपनीय माहिती च्या आधारे आरोपींना पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख शोएब शेख जमीर,(१९,रा.भगतवाडी,अकोला ) आदर्शसिंग सुरेश सिंग, (२०, रा. कुंवरपूर, काशिदीन, कन्नौज, गुलरिया पूर उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेऊन वरील दोन्ही गुन्ह्यांमध्ये 1 बॅग, लिनोवो कंपनीचा 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 3 हँडपर्स, 3000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. रुपये रोख तक्रारदाराची कागदपत्रे आणि इतर साहित्य असे एकूण 45 रुपये 200/- जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार सो, अप्पर पोलीस अधीक्षक सौ.वैशाली शिंदे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत तारगे साहेब यांच्या मार्गदर्श नाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे, रेल्वे संरक्षण दलाचे निरीक्षक युनूस खान, उपनिरीक्षक एच.एम.शाह, सहाय्यक एस. पोउपनि सतीश चव्हाण, पो.ह.गणेश वाघाडे, पी. शि .कपिल गवई, पी. शि . उल्हास जाधव, पो . शि.अमोल अवचार यांनी ही कारवाई केली.
0 Comments