Header Ads Widget

Responsive Image

अकोला शहर वाहतुक नियंत्रण शाखेचा स्तुत्य उपक्रम.. ड्रायव्हरांचा केला सत्कार

अकोला :- मुकेश भावसार

शहर वाहतुक नियंत्रण शाखेकडुन ड्रायव्हर डे ( चालक ) निम्मित ड्रॉयव्हर ( चालक ) यांचा सत्कार

आज अकोला वाहतूक शाखेकडून शहरातील ड्रॉयव्हर ( चालक ) मनपा घंटा गाड़ी चालक, अग्निशमन गाड़ी चालक ST बस चालक , ऑटो रिक्शा चालक, पेट्रोल डिझेल गाडी चालक तसेच शहरातील रक्त संकलनच्या, तसेच रुग्णवाहिका चालक व चालकां ना प्रशिक्षण देणारे संस्था चालक यांचा ड्रायव्हर ( चालक )दिन निमित्ताने सत्कार करून त्याना पुष्पगुच्छ मिठाई देवून त्यांच्या कर्तव्याचा यथोचित गौरव करण्यात आला.


देशाच्या व राज्याचा प्रगतिमध्ये चालकांचा मोठा सहभाग आहे असे प्रतिपादन वाहतुक पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील यांनी केले व त्यानां गौरविण्यात आले.
पोलिस निरीक्षक विलास पाटिल व वाहतूक शाखेने त्यांचे आभार व्यक्त केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी
PSI सुरेश वाघ , PSI युनुस शेख, चालक नईम शेख , मुळदकर, पो. कॉ. उमेश इंगळे, राधेश्याम पटेल , सचिन दवंडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


Post a Comment

0 Comments