Header Ads Widget

Responsive Image

अमळनेर लाड शाखीय वाणी समाजाची कार्यकारणी घोषित... पहिल्यांदा महिलांना कार्यकारणीत स्थान

अमळनेर (मुकेश भावसार )विकी

अमळनेर लाड शाखीय वाणी समाजाच्या अध्यक्षपदी श्री विनोद प्रभाकर कोठावदे यांची, उपाध्यक्ष पदी सौ. वनिता मंगेश महिंद तर सेक्रेटरीपदी श्री संजय दत्तात्रय भामरे यांची निवड

दि.२८ऑगस्ट २०२२ रोजी पार पाडलेल्या लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाच्या निवडणुकीत एकूण ११ समाज प्रतिनिधींची निवड करण्यात आली.
लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाने नवीन कार्यकारिणीत पुरुषां सोबत महिलांनाही महत्वाच्या पदावर स्थान देऊन महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला .
अध्यक्षपदी श्री. विनोद प्रभाकर कोठावदे यांची, उपाध्यक्षपदी
सौ. वनिता मंगेश महिंद तर सेक्रेटरीपदी श्री. संजय दत्तात्रय भामरे यांची निवड करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीत सहसेक्रेटरी म्हणून श्री. प्रकाश काशिनाथ अमृतकर, खजिनदार श्री. नितिन मुरलीधर भदाणे संचालक श्री. जितेंद्र हरी राणे,
श्री. पंकज मराठे, श्री. योगेश येवले,
श्री. सुनिल वाणी, श्री. सुनील भामरे,
सौ. मंगला शिरोडे, यांचा समावेश आहे. नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
तसेच त्यांच्याकडून समाजासाठी भरीव कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून नूतन पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या काळात आपण नवनवीन आधुनिकतेने समाजाच्या समाजो पयोगी विविध कार्यक्रम राबवून समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नविन कार्यकारणी मंडळाला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments