अमळनेर भावसार क्षत्रिय समाजा ची शेकडो वर्षांची अखंड गरबा गायन व घटस्थापना परंपरा आज ही नित्य नियमाने जोपासली जाते...
आझाद नायक न्युज :- विकी भावसार
अमळनेर भावसार समाजातर्फ आज ही गणपती, नवरात्रचे गरबा गायन , व घट स्थापनेची परंपरा जोपासली जात आहे.
आठ दिवस अगोदर मिटिंग घेण्यासाठी व मिटिंग मध्ये उपस्थित राहण्यासाठी कार्यकारणी मंडळाच्या आदेशाने सर्व समाज बांधवाना समाजातील सेवक हे घरोघरी जाऊन आमंत्रित करतात एका रजिस्टर ( वही ) वर घरातील एका व्यक्तीची सही घेऊन त्यांना अजेंडा वाचायला देतात व ठरल्याप्रमाणे उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात येते.
मिटिंगच्या दिवशी रात्रीमाता हिंगलाज देवीच्या आरतीची, हाराची, प्रसादाची, अखंड नंदादीपकाची, व अष्टमी पुजनाची , बोली लावुन लिलाव केला जातो, व यात सर्व समाज बांधव उत्साहाने सहभाग घेवुन लीलावात सर्वात जास्त पैशाची बोली लावुन आरती , पूजा, प्रसाद, अष्टमी होम हवन तसेच अखंड नंददीपच्या, सेवेचा लाभ घेतात. व नंतर ज्या समाज बांधवाना स्वेच्छेने काही नवरात्री उत्सव देणगी द्यायची असेल तर ती संबंधित ट्रस्टी कडे जमा करतात.
मग होते खरी नवरात्र उत्सवला सुरवात एक दिवस अगोदर देवीच्या मढीला स्वच्छ पाण्याने चांगले धुतले जाते साफ सफाई केली जाते.
व घटस्थापनेच्या दिवशी घट बसवून यथोचित देवींची आरती , पूजा केली जाते. यां दिवसापासून ते दसऱ्या पर्यंत येथील मढीत गरबा गायनाचे कार्यक्रम केले जातात.
अगोदर तर श्रीकृष्ण राधा हनुमान यांचे वेशभूषा केलेले समाज बांधव असायचे ते रात्रभर घटाच्या अवती भोंवती गरब्यावर नृत्य करायचे.
आणि शेवटच्या दिवशी सर्व समाज बांधवाना दूध व देवीच्या वर जे पापड्या ( फुलारा ) चा प्रसाद देऊन व नऊ दिवस ज्यांनी सेवा दिली त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करायचा.
यावेळी ढोलकी वादक , गरबा
गाणारे व उपस्थित समाज बांधव घटाला नदीवर जाऊन सकाळी ४:०० वाजता विसर्जित करतात व सर्व समाज बांधव एकमेकांच्या गळ्यात मिठी मारतात यां निमित्ताने व अश्या अनेक धार्मिक उत्सवाने तरी सर्व समाज बांधव एकत्र येऊन देवींची उपासना करतात व मातेच्या चरणी आपली हजेरी लावतात.
0 Comments