Header Ads Widget

Responsive Image

देवदूत डाॅ.रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी किड्स गुरुकुल इंटरनॅशनलला दिली सदिच्छा भेट

संस्कारक्षम व सुसंस्कृत पिढी किड्स गुरुकुल इंटरनॅशनलने निर्माण करावी....
पद्मश्री रवींद्र कोल्हे
जळगाव - आझाद नायक न्युज

येथील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल या शैक्षणिक संकुलात पद्मश्री व अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महान समाजसेवी बैरागड चे मसिहा डाॅ.रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले .
तसेच सर्व शिक्षक ,शिक्षिका, संचालक मंडळ व सर्व कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाची सेवा करावी तसेच देशप्रेम व आपण या समाजाचे काहीतरी लागतो या उदात्त हेतूने शिक्षण सारख्या पवित्र कार्यास आपण वाहून घ्यावे व या कीडस गुरुकुलच्या माध्यमातून सुसंस्कृत,सक्षम,आत्म निर्भर व समाजाचे भान ठेवणारी पिढी निर्माण करावी असा आशावाद व्यक्त केला.
डॉ. रवींद्र कोल्हे यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करून सभागृहाला आत्मपरीक्षण करायला लावले तसेच डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी आपलं तरुणपण, आपला विवाह व सामाजिक कार्य तसेच इतर अनेक किस्से सांगून सभागृहात हलकं फुलकं व विनोदी वातावरण निर्माण केले. त्याचप्रमाणे कोल्हे दाम्पत्यांनी आपला संपूर्ण जीवनपटच उलगडून दाखवला. त्यावेळी मात्र सर्व वातावरण गंभीर झाले होते. "कुपोषण" या शब्दाची निर्मिती चा किस्सा ही त्यांनी कथन केला.अनेकांनी या कार्यक्रमात काही प्रश्न विचारून या दांपत्यांना बोलते केले तसेच सभागृहात वातावरण इतके भारवलेले होते की काहींच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळले त्यांचा साधेपणा,निरालस व निरागस पणा,तसेच सामाजीक ऊत्तरदायीत्व व ऊच्च विचारसरणी सर्वांना भावला.या कार्यक्रमाला किड्स गुरुकुलचे सर्वे सर्वा आदेश ललवाणी तसेच संचालिका सौ. सपना ललवाणी मीनल जैन भुसावळ येथील कोटेच्या महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डि.एम.ललवाणी व तसेच भादलीयेथील रुरल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक श्री.जी.एम.महाजन सर उपस्थित होते.


.

Post a Comment

0 Comments