Header Ads Widget

Responsive Image

इंदोर नंतर आता मनोर येथील घटना.. पालघर अमळनेर बसचा मोठा अपघात..

 आझाद नायक न्युज

  इंदोर नंतर आता मनोर येथील घटना..  पालघर अमळनेर बसचा मोठा अपघात..

इंदोर नंतर आता मनोर येथील घटना..

मनोर विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्याजवळ पालघरहून अमळनेरला जाणारी एसटी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली.
गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
पालघरवरून अमळनेरकडे जाणारी एसटी बस मनोर विक्रमगड रस्त्यावर केव फाट्यावरून प्रवासी घेतल्यानंतर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. काही अंतर पुढे गेल्यावर बस आणि समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातात एसटी चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये विक्रमगड जव्हारच्या दिशेने जाणारे तीस प्रवासी प्रवास करीत होते.

अपघातात जखमींची नावे
एसटी बसचालक तवाब खान (३२), कैमुद्दीन शेख (३१) धीरेंद्र यादव (३२) राधेश्याम तिवारी (३८), रवींद्र यादव (४०) आणि दयानंद (५४).
पुढील तपास मनोर पोलीस करीत आहेत 

Post a Comment

0 Comments