स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिना निमित्त ऐतिहासिक मुशायरा आणि सत्कार संपन्न...
अमळनेरचे आण्णा साहेब सुभाष चौधरी यांना "समाज रत्न" पुरस्काराने सन्मानित...
स्वातंत्र्य सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रह.) स्टडी सेंटर & पब्लिक लायब्ररी अमळनेर या सामाजिक संस्थे मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त अखिल भारतीय पातळीवरील मुशायरा चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल अमळनेर येथेकरण्यात आले होते या कार्यक्रमा त अंमळनेर व जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांना ते करीत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्या व्यक्तींना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात पाडळसे जन आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आण्णासाहेब सुभाष चौधरी यांचा समावेश होता.
अल्लामा फजले हक खैराबादी संस्थेचे अध्यक्ष रियाज शेख यांनी या पुरस्कारा बाबत प्रास्ताविक विशद करून समाज रत्न पुरस्कार संबंधितांना का देण्यात आला त्याबद्दल सविस्तर अशी माहिती विशद केली.
अमळनेर तालुक्यातील जनतेचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजेच आण्णा साहेब सुभाष चौधरी भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर 3 पंच वार्षिक नगरपरिषदे त मुस्लिम वाॅर्डा तून मुस्लिम बांधवांनी त्यांना निवडून दिले.
अर्बन बँकेत प्रचार न करता निवडून येण्याचा विक्रम यांच्या नावावर आहे,
नगरपरिषदेत बिनविरोध नगराध्यक्ष,
अर्बन बँकेत बिनविरोध चेअरमन,
शांतता कमिटीचे ज्येष्ठ सदस्य,
विधानसभेची दावेदारी असल्यावर सुध्दा वरिष्ठांनी नाही सांगितल्यावर नाराज न होता पक्षांच्या उमेदवारां साठी मेहनत करुन भाजपाचाआमदार निवडून आणला,
2001सालापासून कोणतीही निवडणूक न लढाविता 6 तालुक्याच्या जनतेच्या कल्याणासाठी जनतेची मोट बांधली,पाडळसे धरणासाठी प्रचंड असे आंदोलन उभे केले,याची सरकार ला दखल घ्यावी लागली.
नगराध्यक्ष, नगरसेवक ,कापूस फेडरेशनचा प्रशासक,भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय परिषद सदस्य, असे अनेक मोठे मोठे पदे त्यांना मिळाली व त्या पदांना शोभेल असे काम त्यांनी केले येवढे असुन सुद्धा त्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवली आहे.
आज वयाच्या 72 व्या वर्षी सुद्धा ताट मानेने ते आज काम करत आहेत आजच्या समाजात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांना सलाम करतो कोणत्याही जाती धर्माचा माणूस त्यांचेकडे रडत गेला असेल तर तो हसतच बाहेर पडला..!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगावचे सुप्रसिद्ध शायर साबीर मुस्तफा आबादी यांनी तर आभार ऍड.रज़्ज़ाक शेख यांनी मानले.
0 Comments