Header Ads Widget

Responsive Image

ATM मशीन फोडणाऱ्या जळगांव जिल्ह्यातील तरुणांसह हरियाणाच्या टोळीचा आवळल्या मुसक्या...

ATM मशीन फोडणाऱ्या जळगांव जिल्ह्यातील तरुणांसह हरियाणा च्या टोळीचा आवळल्या मुसक्या...

जळगांव :- आझाद नायक न्युज 

जळगाव जिल्ह्यात गॅस कटरने ATM मशीन फोडत धुमाकूळ घालणार्‍या टोळीतील एका सदस्याला हरीयाणा राज्यातून गुन्हे शाखेने अटक केली आहे.
तसेच चोर्‍यांसाठी मदत करणार्‍या जामनेरच्या शेख शोएब शेख रफिक रा. मदनी नगर, जामनेर अटक करण्यात आली.
 आरोपीने बोदवड सह जामनेर व नेरीतील चोरीची कबुली दिली आहेत तर टोळीतील पाच ते सात साथीदार मात्र पसार आहेत.

वारीस उर्फ कालू जलालू खान (खिल्लुका, ता.हातीन, जि.पलवल, हरीयाणा) व शेख शोएब शेख रफिक (मदनी नगर, जामनेर) अशी अटके तील आरोपींची नावे आहेत.
जामनेर पोलिस ठाणे हद्दीत ४३ हजार ५०० तर कासोदा हद्दीत ९ लाख ५५ हजार व बोदवड शहरातून ३१ लाख १० हजार मिळून एकूण ४१ लाख ८ हजार ५०० रुपयांची रोकड गॅस कटरद्वारे एटीएम फोडून लांबवण्यात आली होती.

गुन्हे शाखेने या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर जामनेरचे काही संशयीत हरीयाणा कापूस विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली तर काही हरीयाणा येथून जामनेरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेख शोएब शेख रफिक यास अटक करण्यात आली. संशयीताने आरोपींची नावे सांगितल्यानंतर पथकाने स्थानिक हरीयाणा पोलिसांच्या मदतीने वारीस खान यास अटक केली असता आरोपीं चे पाच ते सात साथीदार असून ते पसार झाले आहेत तर एक आरोपी तिहारच्या कारागृहात आहे.

जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार बकाले यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक अमोल देवछे, अश्रफ शेख, लक्ष्मण पाटील,संदीप सावळे,दीपक पाटील विनोद पाटील,किशोर राठोड, रणजीत जाधव,नंदलाल पाटील कृष्णा देशमुख,भगवान पाटील, ईश्वर पाटील,मुरलिधर पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments