Header Ads Widget

Responsive Image

कावड यात्रेच्या पर्वावर पुर्णा नदीच्या काठावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक सज्ज..

कावड यात्रेच्या पर्वावर पुर्णा नदीच्या काठावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक सज्ज..        
  
आज दि.21/08/2022 रोजी लाखपुरी ता.मूर्तिजापूर व अकोला तालुक्यातील गांधीग्राम येथे पुर्णा नदीच्या काठावर लाखो भक्त कावड यात्रेकरीता येत असतात,यात्रेवेळी कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये याकरिता मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व निवासी उप जिल्हाधिकारी अकोला,उपविभागीय अधिकारी अकोला,उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर ,तहसीलदार अकोला, तहसीलदार मूर्तिजापूर यांचे मार्गदर्शनात यांच्या जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा धिकारी कार्यालय,अकोलाच्या शोध व बचाव पथके बोट व साहित्यासह सज्ज ठेवण्यात आली आहेत.
   सदर पथकामध्ये तलाठी सुनील कल्ले, तलाठी हरीहर निमकंडे,सचिन चिकार,प्रशांत सायरे, महेश सोनटक्के, देवेंद्र तेलकर ,रहीम शाह व कुरणखेड येथील वंदे मातरम् आपत्कालीन शोध व बचाव पथक चे अध्यक्ष उमेश आटोटे, नितीन जामनिक, सचिन मोहोड नजर अली, सचिन शिराळे, मनीष मेश्राम,संत गाडगेबाबा आप त्कालीन पथकाचे दीपक सदाफळे, इत्यादी सदस्य उपस्थित आहेत,
तसेच आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका,निलेश देव मित्र मंडळ रुगवाहिका उपलब्ध आहे गांधीग्राम व लाखपुरी येथील पुर्णा नदीकाठावर कावड यात्रेकरीता आपत्ती व्यवस्थापन पथक रात्रीस सज्ज आहे.

Post a Comment

0 Comments