अमळनेर :- आझाद नायक प्रतिनिधी
तांदळी येथुन काही दिवसांपूर्वी येथील विद्यार्थिनी दहावी पास झाल्यानंतर पहिल्यांदा अमळनेर तहसील आवारात आले असता त्या ठिकाणी कोणतेही फलक नव्हते तरी या ठिकाणी विद्यार्थिनी तहसील कार्यालयाची शोधा शोध करू लागल्या.
तहसील कार्यालय सापडल्यावर त्या ठिकाणी त्यांना कुठलेही फलक आढळून आले नाही. त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला कि या ठिकाणी तहसील ऑफिस असे फलक असले पाहिजे? हे काम फक्त माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा च करू शकतात हे त्यांच्या लक्ष्यात आले व त्यांनी कार्यकर्त्याकडून मोबाईल नंबर घेऊन त्याच ठिकाणाहून साहेबराव दादा यांना कॉल करून सत्य परिस्थिती सांगितली व दादांनी त्या विद्यार्थिनींची विचारपूस केली असता त्यावर मुलींनी मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना उत्तर दिले व दादांनी त्यांना तात्काळ तहसील कार्यालयावर फलक लावण्याचे आश्वासन दिले व दुसऱ्या दिवशी स्व: खर्चाने तहसील कार्यालयावर फलक लावला हे विद्यार्थीनींना कळताच गावाकऱ्यांकडून साहेबराव दादा यांचे आभार मानले व सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments