Header Ads Widget

Responsive Image

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिवणी शाखा अधिकारीची मुजोर शाही वाढली ग्राहकांना नाहक त्रास.... जेष्ठ नागरिकांनां व महिलांनां अपमानस्पद वागणुक.....


सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिवणी शाखा अधिकारीची मुजोर शाही वाढली ग्राहकांना नाहक त्रास....

जेष्ठ नागरिकांनां व महिलांनां अपमानस्पद वागणुक.....

शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करावी.....
क्षेत्रिय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

अकोला ः - आझाद नायक न्युज

अकोला शहरातील शिवणी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी व मुजोर कर्मचाऱ्यांचा चालू असलेला मनमानी कारभार थांबवून खातेदांना सतत होणाऱ्या अडचणीपासून मुक्त करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश शिरसाठ यांनी ता. ३० जून रोजी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे एक निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
शिरसाठ यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाखेतील शाखाधिकारी व इतर कर्मचारी बँकेतील खातेदारांना सतत अपमाणास्पद वागणूक देतात, ज्येष्ठ नागरिकांना तर शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नेहमची त्रास दिल्या जातो, ज्येष्ठ नागरिक श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना यासह अनेक शासकीय योजनांचे शासनाकडून दरमहा मिळणारे अनुदान घेण्यासाठी शाखेत आले असता, कोणताही कर्मचारी वृद्ध महिला-पुरुषांना सहकार्य करत नाही. त्याऐवजी कर्मचाऱ्यांकडून वृद्ध खातेदारांची नेहमीच पिळवणूक केल्या जात असल्याचे अनेक घटनांवरून आढळून आले. शाखेत प्रिंटर चालू असतानाही कर्मचारी खातेदारांना प्रिंटरमध्ये बिघाड असल्याचे सांगून पासबुकवर प्रिंट देत नाहीत. परंतु, काही ओळखीचे चेहरे पाहून हातोहात नादुरुस्त प्रिंटर चालू होत असल्याचे अनेक वेळा पाहवयास मिळाले. याबाबत शाखाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, या परिसरातील खातेदार विनाकारण नेहमीच वाद घालतात, त्यांना सिस्टमधले काहीच कळत नाही, आम्ही किती दबावात काम करतो आमचे आम्हालाच माहीत आहे, असे उडवा-उडवीचे उत्तरे त्यांच्याकडून दिले जातात. एखादा व्यक्ती ज्येष्ठ नागरिकांची मदत करायला गेला, तर त्यालाही शाखाधिकाऱ्यांकडून दम दिला जातो. पंधरा ते वीस दिवसांपासून शाखेत पासबुक नसल्याचे खातेदारांना सांगण्यात येते. परंतु, काही जवळच्या व्यक्तीला शाखाधिकाऱ्यांकडून नवीन पासबुक दिल्या जाते. त्यामुळे शाखाधिकाऱ्यांच्या त्रासाला बँकेतील अनेक खातेदार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आपण संबंधित शाखाधिकाऱ्यांची व काही मुजोर कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी शिरसाठ यांनी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

खाते काढण्यासाठी हिच बँक दिसते का?
एखादा नागरिक बँकेत खाते काढण्या साठी शाखेत आला असता, तुम्हाला हिच बँक दिसते का? शासकीय बँकच पाहिजे असल्यास पी.के.व्ही.मधील स्टेट बँक आहे या शाखेत मणुष्यबळ कमी असल्याने येथे खाते काढण्यासाठी दीड-दोन महिन्यांचा वेळ लागू शकतो, त्यामुळे तुम्ही या शाखेत खाते काढू नका, असा अगाऊचा सल्ला शाखाधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचे आढळून आले.

दुपारी कामाच्या वेळी ‘लंच ब्रेक’च्या नावावर एक-एक तास काउंटर बंद करण्याचे काम शाखाधिकाऱ्यांकडून केल्या जात आहे. ‘लंच ब्रेक’ असतानाही नियमानुसार एक काउंटर चालू ठेवावे लागते, याबाबत शाखाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, आम्ही आता उपाशीच रहावे का? बँकेतील काम तुम्ही सांगितल्यानुसार होतील का? आम्हाला शासनाकडून वेतन दिले जाते, त्यामुळे आम्ही शासनाचेच नियम पाळणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते.

Post a Comment

0 Comments