2017 पासून अकोट हिवरखेड आम्ला खुर्द रेल्वेमार्गाचे काम सुरूच झाले नाही
मेळघाट बाहेरून रेल्वेमार्ग निश्चित झाल्याने लक्षावधी जनतेला मिळणार सुविधा
हिवरखेड प्रतिनिधी:- अकोला- खंडवा- इंदोर या रेल्वे मार्गावरील अकोट- हिवरखेड - आमला खुर्द ह्या टप्प्याचे काम तब्बल 6 वर्षांपासून अजून सुद्धा सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा आणि 2012 पासून मंजुरात असलेल्या अकोला इंदौर रतलाम ब्रॉडगेज प्रकल्पातील अकोट- हिवरखेड- आमला खुर्द या टप्प्याचे काम मेळघाट मधील जुन्या मार्गावरून करावे की प्रस्तावित नवीन मार्गावरून व्हावे याबाबत मागील काही वर्षात राजकारण प्रचंड तापले होते. ह्या वादाला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, भाजप विरुद्ध शिवसेना, पर्यावरणप्रेमी विरुद्ध विकास प्रेमी, अमरावती जिल्हा विरुद्ध बुलढाणा जिल्हा असे विविध द्वंदाचे स्वरूप मागील वर्षात प्राप्त झाले होते. त्यामुळे ह्या मार्गाचे काम सुरू होण्याऐवजी हा विषय प्रचंड रेंगाळत गुंतागुंतीचा झाला. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम कधी सुरू होणार? असा संतप्त सवाल जनता विचारत होती. या परिसरातील लाखो रेल्वे प्रवासी रेल्वेमार्गापासून वंचितच राहतील काय? हा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता. 1 जानेवारी 2017 पासून हा मार्ग बंद करण्यात आला होता.
परंतु काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत अकोट खंडवा रेल्वे मार्ग मेळघाटच्या आतून न नेता अडगाव, हिवरखेड रुपराव, सोनाळा, जामोद, उसरणी, खकनार, खिडकी, तुकईथड असा पर्यायी मार्गाने करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अडव्होकेट मनीष जेसवानी यांनी दिली होती. सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांच्याशी बोलताना वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानी सुद्धा नवीन रेल्वेमार्ग मेळघाट बाहेरून जाईल या गोष्टीला दुजोरा दिला.
महत्वाची बाब म्हणजे आता केंद्र व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असल्याने डबल इंजिन सरकार झाले आहे. सोबतच जळगाव जमोद चे आमदार संजय कुटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. हा नवीन रेल्वे मार्ग झाल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा त्यांच्या मतदारसंघातील जनतेला आणि बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. तसेच अकोला जिल्ह्याला सुद्धा एक ते दोन मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र व राज्यात आता डबल इंजिन सरकार असल्याने अकोट हिवरखेड आमला खुर्द या सेक्शन च्या ब्रॉडगेजचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता बुलेट ट्रेनच्या गतीने सुरू करून पूर्ण करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करावी. तसेच अकोट येथून अकोला मार्गे विविध रेल्वेगाड्या तात्काळ सुरू कराव्यात अशी आग्रहाची मागणी हिवरखेड विकास मंच, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, व आदर्श पत्रकार संघाचे संदीप इंगळे, राजेश पांडव, सूरज चौबे, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, राहुल गिऱ्हे, अनिल कवळकार, जावेद खान, उमर बेग, धिरज बजाज यांचेसह, तेल्हारा तालुका मंडप बिछायत डेकोरेशन असोसिएशन, समस्त व्यापारी संघटना हिवरखेड, प्रकाश शर्मा, सुरेश गिऱ्हे, प्रभाकर जाधव, गजानन राऊत दानापूर, श्याम आकोटकर बावनबीर, स्वप्नील देशमुख सोनाळा,राजकुमार भट्टड सौन्दळा,शोएब वासेसा हिंगोली,सै. रियाज अली हिंगोली यांचेसह शेकडो रेल्वे प्रेमी नागरिक आणि विविध संघटनांनी केली आहे.
प्रतिक्रिया
केंद्र व राज्यात आता डबल इंजिन सरकार असल्याने अकोट हिवरखेड आमला खुर्द या सेक्शनच्या ब्रॉडगेज चे अनेक वर्षांपासून रखडलेले काम आता बुलेट ट्रेनच्या गतीने सुरू करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करावी. धिरज संतोष बजाज, संयोजक हिवरखेड विकास मंच.
0 Comments