सर्व वारकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे केले वाटप .
संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या प्रसाद महाराज यांच्या दिंडीचे आगमन नान्नजमध्ये सोमवारी सायंकाळी झाले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या आनंद किंबहुने महाराज यांच्या घरी दिंडीचा मुक्काम पडला. मंगळवारी सकाळी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी नान्नजमधील मुख्य चौकात मुस्लिम बांधवांनी दिंडीचे व प्रसाद महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी आनंद किंबहुने महाराज, हाजी रज्जाक कुरेशी, नागनाथ कोळपकर, रवींद्र देशमुख, भाऊसाहेब कोळपकर, संतोष मोहळकर, नंदकुमार कोळपकर, अजय राजपूत, हनुमंत शितोळे, खंडू गोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाविद शेख, कय्युम शेख, मुस्ताक पठाण, अमर चाऊस, लियाकत शेख, जमील शेख, इनूस पठाण, गणी आतार, खलील कुरेशी, बब्बू शेख, उमर आतार, फारुक शेख, समीर शेख आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments