अमळनेर :- मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षस्थानी होणार आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत असतील. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, पंचायत समिती सभापती त्रिवेणाबाई अहिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,मिरा- भाईंदर महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव हे विशेष अतिथी असतील. यावेळी अमळनेर सह परिसरातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रांतील अनेक मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सकाळी ८ वाजता धुळे रोडवरील साने गुरुजी विद्यामंदिराच्या प्रांगणातून वृक्ष दिंडी व पर्यावरण बचाव लोकचळवळ रॅलीचा प्रारंभ होईल.
५००० हजार सेलो वाटर बॉटलचे होईल वाटप
तसेच याच सोहळ्यात ५००० गरजू विध्यार्थ्यांना सेलो कंपनीच्या वॉटर बॉटल्सचेही मोफत वाटप होईल.
पर्यावरण विषयक जनजागर प्रसंगी पर्यावरण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या मार्गाने जाईल रॅली
स्टेशन रोड-नगरपालिका-सुभाष चौक-राणी लक्ष्मीबाई चौक-सराफ बाजार- पानखिडकी -वाडी चौक-वाड़ी चौका मागील बोरी नदीच्या पात्रात रॅलीचा समारोप होईल.
0 Comments