अकोला . खदान पोलिस स्टेशन मध्ये खडकी येथील बार्शीटाकळी रोडवर श्रद्धा रेसीडेन्सी येथे राहणाऱ्या मिरा काशीराम खरात (४९) यांनी खदान पोलिस स्टेशनला दिलेल्या माहिती वरून अमरावती येथील चंद्रकला कैलास गिरी (५६) या महिले विरुद्ध फिर्याद दिली.
या तक्रारी नुसार फिर्यादी ही तिच्या परीवारासह वरील पत्त्यावर राहते.
त्या महसुल विभागातून वरीष्ठ लिपीक या पदावरून वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त झाल्या आहेत.
गेल्या आठ-नऊ महिन्यापूर्वी एक महिला त्यांच्याकडे खोली भाड्याने घेणेकरिता आली. तिने स्नेहा जुमळे असे नाव सांगून ती BEO (गटशिक्षणाधिकारी) असल्याचे सागितले. ओळखपत्रसुद्धा दाखविले. त्यामुळे फिर्यादीने जवाई महेश पाटकर यांचे घर सात हजार रुपये प्रमाणे भाड्याने दिले. दरम्यान तिने फिर्यादीला सांगितले की तिची मुंबई व इतर ठिकाणी चांगली ओळख आहे.ती तरुणांना नोकरी वर लावून देते. फिर्यादीचा मुलगा राहुल खरात हा बेरोजगार आहे. त्याला नोकरी वर लावण्यासाठी फिर्यादीला ३० लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे टप्या-टप्याने देण्याचे ठरले . त्यानुसार ता. ११ फेब्रुवारी २२ व २३ मार्च २०२२ पर्यंत फिर्यादीने त्या महिलेला २७ लाख रुपये रोख दिले. पैसे घेतल्या नंतरही आजपर्यंत मुलाला नोकरीवर लावले नाही व घेतलेले पैसे परत केले नाही. वारंवार पैशाची मागणी केली.
मुलाला नोकरीवर लावण्यास सांगितले परंतु ती नेहमी काहीतरी कारण सांगून उडवाउडवीचे उतर देत होती.
ता. २१ / ०४/ २०२२ रोजी आरोपी महिला फिर्यादीच्या घरी आली. तुमच्या मुलाला नोकरी लागते असे सांगून देव दर्शनाला जाण्याचा आग्रह धरला. स्नेहा जुमळे तिचा मुलासह कौस्तुभ व सून जान्हवी असे तुळजापूर,नांदेड,अंबाजोगाई आदी ठिकाणी फिरून आले. अकोला येथे परत आल्यानंतर आरोपी महिलेने केलेल्या मागणीनुसार फिर्यादीने परत ५० हजार रुपये सह पूर्ण रक्कम रोख दिली.
ता. ३० जून रोजी सकाळी १०.३० वाजता दरम्यान फिर्यादी आरोपी महिलेच्या घरात गेली व मुलाची ऑर्डर कुठे आहे म्हणून विचारणा केली.
त्यावेळी आरोपी महिलेने त्यांच्याशी वाद घातला व पैसेही परत करत नाही असे बजाविले.
त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावरून मिरा खरात यांनी आरोपी महिलेविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.
खदान पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक प्रमोद सोनवणे यांनी खरात यांच्या तक्रारीचा तपास केला असता स्नेहा जुमळे ह्या खोट्या नावाने वावरणारी महिला ही अमरावती येथील शेगाव नाका परिसरात एशियाड कॉलनीमध्ये राहणारी चंद्रकला कैलास गिरी (५६) असे असल्याचे आढळून आले तिने दाखविलेले ओळखपत्रही खोटे असल्याचे आढळुन आले.
तपासानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेला पोलिसांनी गुरुवारीच अटक केली असून आज शुक्रवारी रोजी तिला न्यायालयात हजर करण्यात आले.
0 Comments